शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सुरेखा भोसलेंसह सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Updated: January 31, 2017 19:43 IST

महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विभागात मंगळवारी (दि.३१) सहा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

इंदिरानगर : महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विभागात मंगळवारी (दि.३१) सहा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. त्यामध्ये मनसेच्या नगरसेवक व सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांच्यासह सेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे यांचा समावेश आहे. माघी गणेश जयंतीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु मंगळवारीही उमेदवारांनी निवडणूक कार्यालयाकडे पाठ फिरविली. नाशिक पूर्व विभागात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात प्रभाग १३ मधून विद्यमान नगरसेवक सुरेखा भोसले आणि प्रकाश कनोजे, प्रभाग १६ मधून सेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, प्रभाग २३ मधून वैशाली कटारे, प्रभाग १४ मधून गोविंदा बिरुटे व फरीन सय्यद यांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसांत पूर्व विभागात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. पाच दिवसांत प्रभाग १६ आणि २३ मधून एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. मात्र, मंगळवारी या दोन्ही प्रभागात अर्जाचे खाते खोलले गेले. प्रभाग ३० मधून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. मंगळवारी माघी गणेश जयंतीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्याच घोषित न झाल्याने त्याचा परिणाम नामनिर्देशनपत्र दाखल करण्यावरही झाला आहे. आता शेवटचे तीन दिवस उरले असून, या काळात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.  मनसेच्या विद्यमान नगरसेवक व सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांनी कोणत्याही पक्षाच्या नावाचा उल्लेख न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. वास्तविक विद्यमान नगरसेवक म्हणून भोसले यांची मनसेकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, दोन दिवसांपासून भोसले या कॉँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याने त्यांच्या अपक्ष अर्जामुळे पक्षांतराच्या चर्चेला जोर आला आहे.