शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सहा आरोपींचा जामीन फेटाळला

By admin | Updated: April 29, 2016 03:55 IST

सहाही आरोपींचा जामीन अर्ज माणगांव येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील गाजलेल्या पाली दरोडा प्रकरणातील विनोद विष्णू गुडेकर, भगवान महाडिक, आदित्य भुजबळ, स्वप्निल अरणे, अजित शिंदे आणि दीपक महाडिक सहाही आरोपींचा जामीन अर्ज माणगांव येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला आहे. या सहाही आरोपींनी आपले स्वतंत्र जामीन अर्ज माणगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विलास नाईक यांनी दिली आहे. पालीत १५ मार्च २०१६ रोजी संध्याकाळी स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवून गुन्ह्याचा कट रचून पायरीची वाडी येथील दळवी फार्म हाऊस येथे स्थानिक व्यापारी रमेश परमार, ललित ओसवाल, स्वप्निल परमार, कमलेश जैन व संदीप परमार यांना बोलावून त्यांच्याकडील सोने खरेदीकरिता आणलेली १ कोटी १४ लाख रूपयांची रोख रक्कम व सोन्याची चेन, घड्याळ व मोबाइल आदि दरोडा टाकून लुटण्यात आले होते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी गुन्ह्याची रचना आरोपी गुडेकर, संतोष महाडिक, भगवान महाडिक यांनी रचली होती. त्याकरिता विनोद गुडेकर व त्याचे साथीदारांना पुण्याहून आणून फार्महाऊसजवळ लपवून ठेवले होते. सोन्याचे आमिष दाखवून रक्कम लुटून आरोपी परागंदा झाले होते. रायगड पोलिसांनी लुुटीच्या रकमेपोटी १ कोटी आरोपी रमेश महाडिक व भगवान महाडिक यांच्याकडून जप्त केले होते. दरोड्याच्या ठिकाणी व इंडिका कारमध्ये २ लाख रूपये मिळाले होते तसेच विनोद गुडेकर याच्याकडून ८ हजार रूपये जप्त केले होते. लुटीतील ५२ ग्रॅम सोन्याची चेन व रॅडो कंपनीचे घड्याळ सुद्धा जप्त केले होते.