शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाशेजारी बसून आंबटशौकिनांनी बघितला सिनेमा

By admin | Updated: April 1, 2017 23:16 IST

अश्लिल चित्रपट बघताना हृदयविकाराचा झटका येऊन एका निवृत्त शासकीय कर्मचा-याचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 1 :  अश्लिल चित्रपट बघताना हृदयविकाराचा झटका येऊन एका निवृत्त शासकीय कर्मचा-याचा मृत्यू झाला. विजय टॉकीजमध्ये शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, त्याच्या मृतदेहाशेजारी बसून  आंबटशौकिनांनी सिनेमा बघितला. मृत व्यक्ती निवृत्त सरकारी कर्मचारी होता. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो दुपारी ३ च्या सुमारास तन मन धन हा चित्रपट बघायला गेला होता. सिनेमा बघताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो खुर्चीवरून खाली कोसळला. मात्र, त्याच्या आजबाजुची मंडळी नको ती दृष्य बघण्यात गुंंग असल्याने त्याच्याकडे कुणी लक्षच दिले नाही.दुपारी ४.३० च्या सुमारास मध्यंतर झाल्यानंतर त्याच्या आजुबाजुच्यांना आंबटशौकीन प्रेक्षकांनी तो निपचित पडून दिसला. काही जणांनी दारूच्या नशेत पडून असावा, असे समजून त्याला ओलांडले. तर, जाण्यायेण्याला अडसर होत असल्यामुळे त्याला काही जणांनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून प्रेक्षकांतील काहींनी चित्रपटगृहाच्या कर्मचा-यांना त्याची माहिती दिली. दरम्यान, पुन्हा सिनेमा सुरू झाला. कर्मचा-यांनी जवळ येऊन बघितले तेव्हा तो व्यक्ती मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तशाही अवस्थेत चित्रपट बघण्यात आंबटशौकीन प्रेक्षक गुंग होते. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस तेथे पोहचले. त्यांनी चित्रपटगृहातून त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. तो मेयोत पाठविला. मोबाईल आणि ओळखपत्रावरून त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक पोहचले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चित्रपटगृहात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे व्यवस्थापकांनी पोलिसांना सांगितले.---