शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील गाठीभेटींना बसला आळा

By admin | Updated: April 4, 2015 04:49 IST

बदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्यामुळे बदल्यांसाठी मंत्रालयात होणाऱ्या भेटीगाठींना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे.

यदु जोशी, मुंबईबदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्यामुळे बदल्यांसाठी मंत्रालयात होणाऱ्या भेटीगाठींना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिना म्हटला की मंत्र्यांच्या दालनांमध्ये बदल्यांसाठी अधिकाऱ्यांची एकच गर्दी दिसते. बदल्यांचे कंत्राट घेऊन फिरणारे दलाल सक्रिय होतात. दरवर्षी दिसणारे हे चित्र या वेळी फारसे दिसत नाही. फडणवीस सरकारने बदल्यांचे विकेंद्रीकरण करत ‘अ’ वर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे विभागाच्या सचिवांना दिले आहेत. ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्ग अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे खातेप्रमुखांना देण्यात आले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे अधिकारआदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले की, दरवर्षी मार्च आला की बदल्यांसाठी मंत्रालयातील गाठीभेटी संस्कृतीला आळा घाला असे आवाहन करणारे पत्रक महासंघ काढत असते. या वेळी पहिल्यांदाच तशी वेळ आलेली नाही. काही मोजक्या विभागांमध्ये अजूनही विकेंद्रीकरण झालेले नाही अशी तक्रार आम्ही महासंघाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपण सर्व विभागांना विकेंद्रीकरण करायला सांगू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.