शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चौकशीसाठी एसआयटी नेमा!

By admin | Updated: October 18, 2015 02:41 IST

पेण अर्बन बँक घोटाळ्याचा तपास करण्यास पेण पोलीस पूर्णपणे अपयशी ठरल्याने अखेर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शनिवारी उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (एसआयटी)

मुंबई :पेण अर्बन बँक घोटाळ्याचा तपास करण्यास पेण पोलीस पूर्णपणे अपयशी ठरल्याने अखेर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शनिवारी उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. या एसआयटीमध्ये एक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलिसांचा समावेश करत आता या तपासावर उच्च न्यायालयाची करडी नजर राहणार आहे. आरोपींवर येत्या चार महिन्यांत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने पेण पोलिसांना दिले आहेत.पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून सामान्य ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसली. याविरोधात ठेवीदारांच्या संघर्ष समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. गेले चार वर्षे पोलिसांनी तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती केलेली नाही. चार वर्षांपूर्वीही त्यांनी बोगस खात्यामध्ये जमा केलेले सुमारे १६ लाख रुपये जप्त केलेले दाखवले आहेत आणि आता चार वर्षांनंतरही एवढीच रक्कम जमा केल्याचे दाखवले आहे. बोगस खात्यांद्वारे दुसरीकडे वळवण्यात आलेला निधी वसूल करण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. श्रीराम कुलकर्णी व मंदार कुलकर्णी यांनी खंडपीठापुढे केला. त्यावर सहायक सरकारी वकील प्रदीप घरत यांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती खंडपीठाला दिली. बोगस खात्यातील रक्कम बँकेच्या संचालकांच्या नावेच वळवण्यात आली आहे. मात्र त्यांनी ही रक्कम हवालाद्वारे परदेशी पाठवली आहे. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी काही काळ लागणार आहे. आतापर्यंत ४३ जणांना या घोटाळ्याप्रकरणी आरोपी केले आहे. येत्या चार महिन्यांत आरोपींवर आरोपपत्र दाखल करू, असे आश्वासन अ‍ॅड. घरत यांनी खंडपीठाला दिले. सीबीआयला त्यांनी या तपासासाठी बँकेकडून जप्त केलेली सर्व कागदपत्रे एसआयटीच्या स्वाधीन करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)

पोलिसांना चार महिन्यांत आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्या अन्य तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात ठेवली आहे.