शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या टपावर बसून ‘स्कूल चलें हम’

By admin | Updated: October 19, 2016 01:19 IST

शिक्षणाची आस तर स्वस्थ बसू देत नाही... पण शाळेत जाण्यासाठी चांगल्या सुविधा नाहीत.

शंकर कोरटकर,

लोणी देवकर- शिक्षणाची आस तर स्वस्थ बसू देत नाही... पण शाळेत जाण्यासाठी चांगल्या सुविधा नाहीत. अशा वेळी विद्यार्थ्यांना जीवाची पर्वा न करता चक्क टँकरच्या टपावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. लोणी देवकर या गावातील विद्यार्थ्यांवर ही दुर्दैवी वेळ आलेली आहे. शटल बसच्या कमी फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांवर येत असल्याचे कारण सध्या पुढे येत आहे. हात केला तरी न थांबणाऱ्या बस, तर शटल बसच्या कमी असणाऱ्या फेऱ्या, यामुळे पुणे-सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या गावांमधील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी चक्क टँकर वा ट्रकच्या टपावर बसून धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत. त्यामुळे या भागात ताताडीने शटल बसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो लांबपल्ल्याच्या बस धावतात. या बस महामार्गावरील मोठ्या गावांमध्येच थांबा घेतात. तसेच या बसला शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारा पासदेखील चालत नसल्याचे वाहक सांगतात. तसेच स्थानिक शटल बसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे पळसदेव, लोणी देवकर, भिगवण आदी भागांत शिक्षणासाठी जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने ट्रक, टँकरच्या टपावर बसून प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थिनींनाही दररोज असा प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे महामार्ग पोलीस अथवा स्थानिक पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. >भलते धाडस करू नयेटँकरवर बसून प्रवास करताना हा धोकादायक प्रवास जीवावर देखील बेतू शकतो. टँकरचालकांनीही विद्यार्थ्यांना घेण्याचे असे भलते धाडस करू नये. तसेच शिक्षण घेणे सोपे व्हावे, त्यासाठी जीव धोक्यात घालावा लागू नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी बस फेऱ्या तातडीने वाढवणे गरजेचे आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. >अपघात व्हायची वाट पाहताय का ?महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. आम्ही आमच्या मुला-मुलींना शिकवायचे का नाही, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तातडीने इंदापूर आगाराने या भागात शटल बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.