शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात भावंडांची आत्महत्या

By admin | Updated: April 5, 2017 05:57 IST

दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कऱ्हाड ( जि. सातारा) : कर्जाच्या वाढत्या बोजामुळे आत्महत्या केलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांनी लावलेल्या तगाद्यामुळेच दोघांनी आत्महत्या केली असून कुटुंबावरील बँकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली. पोलिसांनी त्यांची समजूत घालून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले.जगन्नाथ कृष्णा चव्हाण (४०) आणि लहान भाऊ विजय (३३, रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. कर्जाला कंटाळून विजयने विष प्राशन केल्यानंतर जगन्नाथने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विद्यानगर व टेंभू येथे सोमवारी रात्री तासाच्या फरकात या दोन घटना घटल्या. या दोघांवर बँकांचे साठ लाखांहून अधिक कर्ज असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. दोघांनी काही वर्षांपूर्वी दोन बँकांकडून कर्ज घेतले. ओगलेवाडी येथे कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान सुरू केले. तसेच चार वर्षांपूर्वी सरकी पेंड तयार करण्याची जे. पी. अ‍ॅग्रो प्रोडक्टस् नावाची कंपनी त्यांनी कडेगाव (जि.सांगली) येथील औद्योगिक वसाहतीत सुरू केली. सुरुवातीला त्यांनी त्या कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड केली. मात्र, कालांतराने व्यवसाय डबघाईस आला. परिणामी, हे दोन्ही बंधू कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. बँकांनी वसुलीसाठी त्यांना नोटीसाही पाठविल्या होत्या. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. त्यातूनच आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)