शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

सर अभिनंदन चांगले काम केले !

By admin | Updated: June 1, 2014 01:03 IST

सात वर्षापूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेल्या नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्याचा आटापिटा सुरू आहे. विश्‍वस्तांच्या या निर्णयाविरोधात शहर

राष्ट्रवादीची गांधीगिरी :  सभापतींचे पुष्पगुच्छ देऊ न उपहासात्मक स्वागत नागपूर : सात वर्षापूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेल्या नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित  अधीक्षक अभियंता नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्याचा आटापिटा सुरू आहे.   विश्‍वस्तांच्या या निर्णयाविरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी  गांधीगिरी करीत  शनिवारी पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात  नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना  पुष्पगुच्छासह निवेदन सादर  केले. परिसरात वासवानीच्या विरोधात घोषणाबाजी केली.  विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व सहमतीने वासवानी याला  पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव आणला  आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना हैराण करणार्‍या भ्रष्ट  वासवानी याला बडतर्फ करण्याचे सोडून त्याला पुन्हा सेवेत पुनस्र्थापित करीत असल्याची माहिती  लोकमतमधील प्रकाशित वृत्तातून मिळाली. बातमी वाचल्यानंतर राहवले नाही म्हणून आपण  सवार्ंचे अभिनंदन करण्यासाठी आल्याचे  पाटील यांनी दराडे यांच्या निदर्शनास आणले.   नागपुरातील सर्वसामान्य माणसाला वेठीस धरणार्‍या  भ्रष्ट वासवानीला नासुप्र सेवेत परत घेण्याचे  कारणच काय. का म्हणून या भ्रष्टाचार्‍याला सेवेत पुन्हा घेण्याचा आटापिटा विश्‍वस्तांनी  चालविला आहे. सभापती म्हणून तुम्हीही याकडे दुर्लक्ष का करीत आहात, असा सवाल अजय  पाटील यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.वासवानीला पुन्हा सेवेत घेणे म्हणजे भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचाच प्रकार आहे. एवढेच  नव्हे तर नासुप्र सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.  वासवानी याने क ोट्यवधीची मालमत्ता जमविली आहे. त्याचेशी  काही राजकीय नेते व बिल्डर्सचे  हितसंबंध गुंतलेले आहेत. तो कारागृहातून बाहेर यावा, यासाठी काही बिल्डर्स सक्रिय झाले होते,  अशी माहिती पाटील यांनी दिली. शिष्टमंडळात मनपातील राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रगती पाटील,  नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, सीमा राऊत, विजय तालेवार, राजेश कुंभलकर, शरद नागदिवे, प्रशांत  बनकर, महेंद्र भांगे, राखी गाडगे, चरणजितसिंग हरविंदरसिंग  मुल्ला, देवीदास घोडे, सुनील राऊ त,  ¬षी कारोडे, विजय शेंडे, तनुज चौबे, श्याम चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.