मुंबई : प्रोप्रायटरी फर्मच्या माध्यमातून ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे, अशा उद्योजकांसाठी एक शुभवर्तमान आहे. कारण अशा उद्योजकांना आजवर सहकारी बँकेत खाते उघडण्यासाठी व्यवसायाचे किमान दोन पुरावे देणे बंधनकारक होते़ त्यात कपात करीत किमान एक पुरावा स्वीकारून बँक खाते सुरू करावे, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. सध्या अखा खात्यासाठी शॉप अॅक्टनुसार जारी होणारा परवाना, पॅन कार्ड, चार्टर्ड अकाउंटंटने संबंधित उद्योजकाच्या उद्योगाला प्रमाणित केलेले प्रमाणपत्र द्यावे लागते. ही सर्व कागदपत्रे असल्याशिवाय बँका खाते सुरू करीत नाही. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात आली. (प्रतिनिधी)
‘करंट’ खात्यासाठी एकच पुरावा
By admin | Updated: April 7, 2015 04:50 IST