शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एकाच दिवसात दहा ‘पाऊसबळी’

By admin | Updated: June 27, 2016 05:12 IST

मान्सूनच्या धुवाधार पावसाने राज्याला दिलासा दिला असतानाच, ‘पाऊसबळीं’ची संख्याही वाढू लागली आहे.

मुंबई : मान्सूनच्या धुवाधार पावसाने राज्याला दिलासा दिला असतानाच, ‘पाऊसबळीं’ची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच पावसाळी वातावरणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाण्यात डुंबणेही अनेकांच्या जिवावर बेतले आहे. गेल्या चोवीस तासांत गडचिरोली, अहमदनगर आणि ठाणे-मुंबईतील विविध ठिकाणी बुडून तब्बल १० जणांचा बळी गेला आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळच्या मोठे वेणगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा रविवारी दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला. भूषण संजय गवळे (१५, इ. दहावी), तेजस सिद्धार्थ गवळे (१५, दहावी), आशिष मोहन गवळे (१२, सातवी) अशी या चुलत भावंडांची नावे असून, दुपारी ते वनखात्याच्या हद्दीत तलावात पोहण्यास उतरले होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून उपचारार्थ नेईपर्यंत उशीर झाला होता.तसेच वाशिमहून आठ दिवसांपूर्वी मूल येथे मामाकडे राहायला आलेल्या तरुणासह दोन मुलांचा रविवारी दुपारी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. कुटुंबीयांसह मामा प्रशांत अप्पलवार मार्कंडा येथे देवदर्शनाला आले होते. या वेळी आंघोळीसाठी वैनगंगेच्या पाण्यात उतरलेल्या अंकुर प्रशांत पाठक (२२), वैभव प्रशांत पाठक (१६) आणि गणेश प्रशांत अप्पलवार (१३) यांचा बुडून मृत्यू झाला. त्याचबरोबर अहमदनगरमधील कुळधरण (ता. कर्जत) येथील शेततळ्यात पोहायला गेलेल्या गौरव बापू गुंड (६, इ. पहिली) व सच्चुत गुलाब गुंड (१०, इ. चौथी) या मुलांचाही रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. सहा-सात फूट खोल शेततळ्यात गौरव-सच्चुत गटांगळ्या खाऊ लागल्यावर शेतात काम करणाऱ्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेले, परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही. मुसळधार पाऊस सुरू असताना शनिवारी दुपारी वीजबिल भरण्यासाठी गेलेली मुंबईतील भांडुप, प्रताप नगर येथील वृद्धा नाल्यात पडून वाहून गेली होती. सुलोचना भालेराव (७०) असे तिचे नाव असून, रविवारी दुपारी नाल्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळला. तसेच मुलुंड संभाजी नगर परिसरातील इस्माईल शेख (३०) हाही शनिवारी बकऱ्यांना चारा देण्यासाठी गेला असता लाल बहादूर शास्त्री मार्गावरील नाल्यात वाहून गेला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>गटांगळ्या खाणाऱ्या कुटुंबाला वाचविण्यात यशमुंबईतील वर्सोवा किनाऱ्याजवळच्या समुद्रात गटांगळ्या खात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले.मनीष आर्या (४३), पत्नी शरयू (४३) आणि मुलगा निर्मित (११) हे रविवारी दुपारी पावसाची मजा घेण्यासाठी समुद्रातील खडकांत उभे असताना अचानक पाण्याची पातळी वाढून गटांगळ्या खाऊ लागले. मात्र फायर रेस्क्यू टीमने तातडीने मदतीला धावून त्यांना पाण्याबाहेर काढले.