शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीमुळे सिंधूताई सपकाळ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 04:49 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील बेशिस्त वाहतूक, बेदरकारपणे वाहने चालवणारे चालक हे आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे.

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील बेशिस्त वाहतूक, बेदरकारपणे वाहने चालवणारे चालक हे आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे डोळ्यांसमोर होणाऱ्या अपघातातून वाचल्यानंतर अनाथांची माय असणाऱ्या सिंधूताई सपकाळ मात्र चांगल्याच संतप्त झाल्या. त्यांनी आयआरबीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. १० दिवसांत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई न केल्यास एक्स्प्रेस-वेवर आंदोलन करण्याचा इशाराही सिंधूतार्इंनी दिला. बुधवारी मध्यरात्री मुंबईहून पुण्याकडे येत असताना त्यांना वाहतुकीच्या बेशिस्तीचे दर्शन झाले. आपल्या डोळ्यांसमोर टळलेला अपघात पाहून त्या चांगल्याच संतप्त झाल्या. तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावर आल्यानंतर त्यांनी नाक्यावरील आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले. पैसे घेऊनही वाहतूक असुरक्षित आहे, आणखी किती जीव घेणार, अशा शब्दांत सिंधूतार्इंनी जाब विचारला. बेदरकारपणे वाहने चालवणारे चालक, अवजड वाहने यामुळे द्रुतगती महामार्गावर प्रवास करणे अत्यंत असुरक्षित झाले आहे. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊनच प्रवास करीत असतो. येत्या १० दिवसांत बेशिस्त वाहनधारकांचा बंदोबस्त नाही केला तर हजारो नागरिकांना रस्त्यावर उतरवून मी इथे आंदोलन करीन, असा इशारा त्यांनी दिला. मार्इंचा हा राग पाहून कर्मचारी निरुत्तर झाले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे यानेही एक्स्प्रेस-वेवरील बेशिस्त वाहतुकीबाबत सोशल मीडियावर भाष्य केले होते. (प्रतिनिधी)