शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

‘स्वदेश दर्शन’साठी सिंधुदुर्गची निवड

By admin | Updated: December 21, 2015 00:29 IST

केंद्र शासनाची योजना : ८२ कोटींची तरतूद : विनायक राऊत यांची माहिती

मालवण : भारतीय पर्यटनाच्या गतिमान विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र्र शासनाने ‘स्वदेश दर्शन’ ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. यासाठी महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील मालवण, देवगड व वेंगुर्ले या तीन किनारपट्टी तालुक्यातील नऊ किनारे आणि विजयदुर्ग खाडीपात्राचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. या योजनेसाठी ८२ कोटी ७६ लाखांची तरतूद करण्यात आली असून, केंद्र शासनाच्या तीन विशेष समित्यांनी मान्यता दिली आहे. ‘स्वदेश दर्शन’ अंतर्गत प्रस्तावित स्थळांचा येत्या एप्रिल महिन्यापासून विकास सुरूकरण्यात येईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, नंदू गवंडे, हरी खोबरेकर, सन्मेश परब, किरण वाळके, किसान मांजरेकर, गौरव वेर्लेकर, जाबीर खान, आदी उपस्थित होते. ‘स्वदेश दर्शन’ या योजनेत विजयदुर्ग खाडी व बीचसाठी सर्वाधिक १६ कोटी ७१ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. तसेच तोंडवळी बीच १२ कोटी ६७ लाख, तारकर्ली बीच १० कोटी २३ लाख, शिरोडा बीच ९ कोटी ७४ लाख, सागरेश्वर बीच ८ कोटी ७८ लाख, देवगड बीच ६ कोटी ९७ लाख, मोचेमाड बीच ६ कोटी ५३ लाख, मिठबाव बीच ५ कोटी ९५ लाख असा निधी खर्च केला जाणार आहे. पर्यटकांना सोयी-सुविधा पुरविताना त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यात किनारपट्टीवर पर्यटकांची सुरक्षा, गझिबो, पाथ वे, बीच लाईट, पार्किंग, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पर्यटन माहिती केंद्र्र अशा अनेक सुविधांसाठी ९ कोटी ७५ लाख तरतूद करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)‘चिवला बीच’साठी आठ कोटींची तरतूदमालवण शहराला केंद्राच्या या ‘स्वदेश दर्शन’ योजनेत विचारात घेतले नाही या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या विशेष पर्यटन योजनेखाली पर्यटन विकासासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये चिवला बीचचा समावेश करण्यात आला असून, चिवला बीचच्या विकासासाठी आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे स्वदेश दर्शन योजनेत चिवला बीचचा समावेश नसला तरी राज्य सरकार चिवला बीच व शहरासह तालुक्यातील अन्य बीचचा विकास करणार आहे. तसेच किल्ले सिंधुदुर्गच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.विमानतळ २०१६ पर्यंत पूर्णत्वासराऊत म्हणाले, पर्यटन विकास साधताना देशी-विदेशी पर्यटक अधिक संख्येने जिल्ह्यात येणार आहेत. यासाठी चिपी येथे होणारे विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांची भेट घेण्यात आली. यावेळी संबंधित ठेकेदाराला राज्य शासनाने २०१६ ची डेडलाईन देत काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पर्यटन वृद्धीसाठी जिल्ह्यात मोठी आलिशान हॉटेल्स उभारणी होणे गरजेचे आहे. पर्यटन विकासात अडसर ठरणाऱ्या सीआरझेड कायद्यात गोवा, तमिळनाडू धर्तीवर ५० मीटरची शिथिलता मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.सी-वर्ल्डचा कमी जागेतील आराखडा पाहिला नाहीसी वर्ल्डबाबत विचारले असता, खासदार विनायक राऊत यांनी १३९० अवास्तव जागेत होणाऱ्या सी वर्ल्डला आपला विरोध होता, असे स्पष्ट केले. शासनाने ३०० ते ४०० एकर जागेत करायचे ठरविले आहे. वायंगणी-तोंडवळी ग्रामस्थ या कमी जागेतील सी वर्ल्डबाबत जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार आहोत; मात्र कमी जागेत सी वर्ल्ड होणार असला तरी त्याचा अंतिम आराखडा व माहिती आपल्याला उपलब्ध झालेली नसल्याचे सांगितले.