शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पर्यावरणस्नेही शहरांसाठी सिमन्स, हिताचीचा हात, दर्शविली राज्य शासनासोबत काम करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 03:36 IST

सिमन्स आणि हिताची या प्रमुख उद्योगसमुहांनी पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्य शासनासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिका-यांशी या संदर्भात दाओसच्या भेटीत चर्चा केली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सिमन्स आणि हिताची या प्रमुख उद्योगसमुहांनी पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्य शासनासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिका-यांशी या संदर्भात दाओसच्या भेटीत चर्चा केली.सिमन्सच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य सेड्रिक निक यांच्याशी चर्चा केली. स्मार्ट शहरे निर्माण करतानाच ती अधिकाधिक पर्यावरणानुकूल करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत यावेळी विस्ताराने चर्चा झाली. अशा शहरांच्या निर्मितीसाठी एक समग्र व्यवस्था उभारण्याकरता महाराष्ट्र शासनासोबत अधिक सहकार्याचे आश्वासन आश्वासन निक यांनी दिले.हिताची इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भारत कौशल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात पथदर्शी प्रकल्प उभारणीसाठी आमची कंपनी सहकार्य करेल, असे कौशल यांनी सांगितले. पिकांच्या उत्पादकता वाढीसंदर्भात तंत्रज्ञान पुरविण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते. स्वित्झर्लंडच्या पर्यावरण, वाहतूक, ऊर्जा आणि संवाद विभागाच्या मंत्री डोरिस ल्यूथर्ड यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. शहरे प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.मुख्यमंत्री-मित्तल चर्चा-पोलाद निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तल कंपनीचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांनी दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गुंतवणुकीबाबत चर्चा केली.भारतामध्ये स्पेशल आॅटोमोबाईल ग्रेड स्टील प्लँट उभारण्याचे नियोजन आर्सेलर मित्तल कंपनी करीत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी मित्तल यांना केली.

टॅग्स :Mumbaiमुंबई