शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

मुंबईत समान वीजदर तूर्त अशक्यच

By admin | Updated: May 27, 2016 00:53 IST

महिन्याकाठी ५०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना समान वीज दर लावण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी

मुुंबई : महिन्याकाठी ५०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना समान वीज दर लावण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संबंधित कंपन्यांची त्यासाठी बैठक घेतली, पण कंपन्यांनी समान वीज दराबाबत असमर्थता व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. समान वीज दर आकारण्याबाबत वीज वितरण कंपन्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. सरकारच्या इच्छेनुसार समान वीज दर लागू केले तर काही कंपन्यांवर त्याचा विपरीत आर्थिक परिणाम होऊन या क्षेत्रातील स्पर्धाच संपेल, असे मत बैठकीत व्यक्त झाले. गुरुवारच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, १०० युनिटपर्यंत समान वीज दर लागू केल्यास रिलायन्सला वार्षिक १५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल आणि ३०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी समान वीज दर लागू केले तर तोट्याचा हा आकडा ३५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. बेस्टनेदेखील संभाव्य तोट्याबाबत रिलायन्सचीच री ओढली. टाटा पॉवरने मात्र समान वीज दराला अनुकूलता दर्शवित राज्य सरकारला काही सूचना केल्या. (विशेष प्रतिनिधी)समान वीज दराबाबत कंपन्यांमधील मतभिन्नता लक्षात घेऊन एकमत होण्याच्या दृष्टीने नवीन फॉर्म्युल्यावर विचार व्हावा, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समान वीज दर असावा, यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. कारण त्याद्वारे मध्यमवर्गीय मतदारांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे सरकारला वाटते. अर्थात भविष्यात राज्य सरकार आणि वीज कंपन्यांमध्ये समान वीज दराबाबत एकमत झाले तरी वीज नियामक आयोगाची (एमईआरसी) अंतिम मंजुरी अंमलबजावणीसाठी अनिवार्य असेल. एकाच शहरात वेगवेगळ्या कंपन्या वीजपुरवठा करीत असताना समान वीज दर लागू करणे शक्य नाही, असे मत एमईआरसीने २००८मध्ये व्यक्त केले होते. समान वीज दर लागू करायचा असेल तर राज्य सरकारने अनुदान देणे ही एकमेव पद्धत असू शकते, असे मत एमईआरसीने २०११मध्ये व्यक्त केले होते.