शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना एक समान चिन्ह

By admin | Updated: January 22, 2017 18:54 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरुपात एक समान चिन्ह देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लगतच्या मागील निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरुपात एक समान चिन्ह देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त पक्षांना भारत निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी राखीव केलेले चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आरक्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाकडील इतर नोंदणीकृत पक्षांना (भारत निवडणूक आयोगाची मान्यता नसलेले) मुक्त चिन्हांमधून एक चिन्ह निवडण्यासाठी प्राधान्य दिले जाते; परंतु एकापेक्षा जास्त नोंदणीकृत पक्षांनी एका जागेसाठी एकाच समान चिन्हाची मागणी केल्यास लॉटरीद्वारे चिन्ह वाटप केले जाते. त्यामुळे एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. यात दुरुस्ती करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश 2009 मध्ये आता त्यानुसार बदल करण्यात आला आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षाने एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लगतच्या मागील निवडणुकीत एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागा जिंकल्या असल्यास त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुक्त चिन्हांपैकी तात्पुरत्या स्वरुपात एक समान चिन्ह देण्याची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण सदस्य संख्येच्या पाच टक्के जागा या एकापेक्षा कमी येत असल्यास किमान एक जागा तरी जिंकलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादा सदस्य संबंधित पक्षाचा केवळ आज रोजी सदस्य आहे म्हणून त्याचा निवडून आलेल्या पाच टक्के सदस्यांत समावेश होणार नाही. कारण लगतच्या मागील निवडणूक पाच टक्के सदस्य संबंधित पक्षाकडून निवडून आलेले असणे आवश्यक आहे. अशा पक्षांना एक समान चिन्हासाठी सक्षण प्राधिकाऱ्याकडे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या दिनांकापासून किमान तीन दिवस आधी अर्ज करणे आवश्यक राहील. अर्जासोबत मागील निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांची यादी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सचिवाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिली. महानगरपालिका निवडणुकांसाठी महानगरपालिकेचे आयुक्त, तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी असतील. सक्षम प्राधिकारी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या दिनांकापासून किमान एक दिवस आधी निर्णय घेईल व तो सर्व संबंधित निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षास कळवेल. संबंधित राजकीय पक्षास प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. एकापेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांनी एकसमान चिन्हाची मागणी केल्यास प्रथम अर्ज प्राप्त झालेल्या पक्षास ते चिन्ह देण्यात येईल व अन्य पक्षास किंवा पक्षांना उर्वरित मुक्त चिन्हांमधून एका चिन्हांची मागणी करण्याची संधी देण्यात येईल.