- गणेश धुरी, नाशिकसिंहस्थ कुंभमेळ््याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गापासून अनेक सुविधांमध्ये फेरबदल केल्याने एकीकडे नाशिककर वैतागले असताना तीन शाहीस्नानांच्या काळात वाहतुकीच्या मेगाब्लॉकमुळे मात्र विद्यार्थ्यांना सुट्यांची ‘पर्वणी’ साधता येणार आहे.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पर्वणी काळात पाच, तर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना सहा दिवस अतिरिक्त सुट्या मिळतील. परिणामी दिवाळीच्या हक्काच्या सुट्ट्यांवर काही प्रमाणात गदा येणार आहे.दिवाळीत प्राथमिकच्या पाच, तर माध्यमिकच्या सहा सुट्या कमी करण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये २९ आॅगस्ट आणि १३ व १८ सप्टेंबरला अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे शाहीस्नान आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना २८ व २९ आॅगस्ट, १३ व १४ आणि १८ व १९ सप्टेंबरला सुटी असेल. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना २८ व २९ आॅगस्ट, १२ व १४ सप्टेंबर, तर १८ व १९ सप्टेंबरला सुटी असेल. त्र्यंबकेश्वरमधील प्राथमिक शाळांना २८ व २९ आॅगस्ट, १४ आणि २४ व २६ सप्टेंबर अशी सुटी आहे. माध्यमिक शाळांना २८ व २९ आॅगस्ट, १२ व १४ सप्टेंबर तसेच २४ व २६ सप्टेंबर सुटी आहे. सिंहस्थातील सुटीचे वाया गेलेले अध्ययनाचे तास भरून काढण्यासाठी दिवाळीत प्राथमिक शाळांच्या पाच दिवस तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सहा सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नाशिकमध्ये सिंहस्थात सुट्यांची ‘पर्वणी’!
By admin | Updated: August 15, 2015 00:38 IST