शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

सत्तापक्ष नेत्यावर मौन

By admin | Updated: November 21, 2014 00:53 IST

महापालिकेतील सत्तापक्ष नेतेपदावरून भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अजूनही थांबलेली नाही. सत्तापक्ष नेते प्रवीण दटके हे महापौर होऊन अडीच महिने झाल्यानंतरही भाजपला नवा सत्तापक्ष नेता

कोर कमिटी घेणार निर्णय : महापौरांनी केले स्पष्ट नागपूर : महापालिकेतील सत्तापक्ष नेतेपदावरून भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अजूनही थांबलेली नाही. सत्तापक्ष नेते प्रवीण दटके हे महापौर होऊन अडीच महिने झाल्यानंतरही भाजपला नवा सत्तापक्ष नेता जाहीर करण्यात यश आलेले नाही. सभागृहात हा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला तेव्हा महापौर दटके यांनी आपणच सत्तापक्ष नेताही असल्याचे स्पष्ट केले. नंतर मात्र, पत्रकारांशी बोलताना भाजपची कोर कमिटी याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.महापालिका सभागृहात सत्तापक्ष नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. पीठासीन अधिकारी म्हणून सभेचे संचालन करणाऱ्या महापौरांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत असताना सत्तापक्ष नेता सक्षमपणे बाजू लावून धरतो व विरोधकांच्या चक्रव्यूहातून सत्तापक्षाला बाहेर काढण्याचे काम करतो. मात्र, प्रवीण दटके हे महापौर झाल्यानंतरही भाजपने नवा सत्तापक्ष नेता नेमलेला नाही. सत्तापक्ष नेता म्हणून सभागृहात एकांकी, पोषक, आक्रमक भूमिका घेता येते पण महापौर म्हणून सम्यक दृष्टिकोन ठेवूनच भूमिका मांडावी लागते व निर्णय घ्यावा लागतो. सत्तापक्ष नेते पदाचा अधिभार महापौर दटके यांच्याकडेच असल्यामुळे आजच्या सभेत सत्तापक्ष नेत्याची कमतरता जाणवली. विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी सुनील अग्रवाल, संदीप जोशी यांना पुढाकार घ्यावा लागला. सत्तापक्ष नेत्याचे स्वतंत्र अस्तीत्व सभागृहात दिसले नाही. ही संधी साधत काँग्रेसचे महेंद्र बोरकर व बसपाचे किशोर गजभिये यांनी सत्तापक्ष नेत्याच्या नावाचा खुलासा करण्याची मागणी केली. विरोध पक्षही शांतविधानसभा निवडणुकीनंतर होणारी महापालिकेची ही पहिली सभा होती. महापौर प्रवीण दटके यांचीही ही पहिलीच सभा होती. त्यामुळे या सभेत राजकीय उट्टे काढण्यासाठी व महापौरांची कोंडी करण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेतील, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. विरोधी पक्षातील सदस्यही कमालीचे शांत होते. विरोध पक्षही शांतविधानसभा निवडणुकीनंतर होणारी महापालिकेची ही पहिली सभा होती. महापौर प्रवीण दटके यांचीही ही पहिलीच सभा होती. त्यामुळे या सभेत राजकीय उट्टे काढण्यासाठी व महापौरांची कोंडी करण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेतील, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. विरोधी पक्षातील सदस्यही कमालीचे शांत होते. नागपूर : महापौर दटके यांनी सध्या आपल्याकडे पदभार असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकला. नंतर पत्रकारांशी बोलताना महापौर दटके म्हणाले, नागपूर विकास आघाडीतर्फे आपले नाव विभागीय आयुक्त कार्यालयात सत्तापक्ष नेता म्हणून नोंदविलेले आहे. सध्या हा कार्यभार आपल्याकडेच आहे. स्वतंत्र सत्तापक्ष नेता नसल्यामुळे सभागृह चालू शकत नाही, असा कुठलाही नियम नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.