शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार !

By admin | Updated: December 6, 2015 03:40 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर

- प्रदीप यादव,  सातारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल)येथे प्रवेश घेतेवेळी मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी १ हजार ११४व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते. ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याचे कारण, या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती. ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना ज्या बंगल्यात वास्तव्यास होते, ते निवासस्थान अलीकडेच महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतले आहे. या निवासस्थानात संग्रहालय होणार असून, त्यामध्ये डॉ. आंबेडकरांची पहिली स्वाक्षरी झळकणार आहे. त्यामुळे या स्वाक्षरीला आता जागतिक स्वरूपाचे महत्त्व येऊ लागले आहे. यासाठी गेली १३ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिन सोहळ्याचे आयोजन करणारे सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते अरुण जावळे प्रयत्न करीत आहेत. या स्वाक्षरीने बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया साताऱ्यात भक्कम करून पुढे ते यशस्वीपणे शिकत राहिले. विदेशातल्या विद्यापीठांमध्ये आपल्या ज्ञानाचा अमीट ठसा उमटविला. जगद्विख्यात झाले. म्हणूनच ‘नॉलेज आॅफ सिम्बॉल’ ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या स्वाक्षरीला एक आगळंवेगळंं महत्त्व आहे. भारत सरकारने डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक स्मृती जतन करण्याचे धोरण अवलंबले आहे. सातारच्या मातीमध्ये डॉ. आंबेडकरांसारखा युगपुरुष शिकला, बागडला. याच मातीमध्ये त्यांनी वास्तव्य केले. या घटना सातारकरांचे ऊर भरून आणणाऱ्या अशाच आहेत. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि या स्वाक्षरीलाही आपण सलामच करायला हवा, असे मत अरुण जावळे यांनी व्यक्त केले.हा तर साताराभूमीचा गौरवआता या स्वाक्षरीला जागतिक अशा स्वरूपाचे महत्त्व प्राप्त होणार असून, जगभरातील आंबेडकर अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळाप्रवेशाच्या दरम्यानची स्वाक्षरी लंडन येथे पाहावयास मिळणार आहे. एका अर्थाने हा सातारच्या भूमीचा, भीमाईभूमीचा गौरव आहेच; परंतु प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे कार्यकर्तृत्व उभे करणाऱ्या महामानवाचाही अभिमान वाटणार आहे. ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं, या देशाला संहिता दिली, नव्हेतर त्या संहितेमुळे जगाच्या पाठीवर सर्वोत्तम अशी लोकशाही प्रणाली निर्माण केली, अशा संविधान शिल्पकाराच्या स्वाक्षरीला म्हणूनच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हा ऐतिहासिक स्वाक्षरी आजही शाळा व्यवस्थापनाने दस्तावेज म्हणून जतन करून ठेवली आहे. आता ही स्वाक्षरी लंडनस्थित त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या संग्रहालयात समाविष्ट व्हावी यासाठी राज्य शासनासह आंबेडकरी चळवळीतील देश-विदेशातील नेते, अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार आणि चर्चा केली आहे. - अरुण जावळे, सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते, सातारा