शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांत जमवल्या ३००० कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांच्या स्वाक्षऱ्या

By admin | Updated: May 23, 2016 10:48 IST

राजकीय दिग्गजांबरोबरच थोर साहित्यिक, कलावंतांच्या ३ हजार स्वाक्षरींचा संग्रह झाला आहे़ कळमकर यांनी अशाच कर्तृत्ववान व्यक्तींची दीड हजार नावे नोंद केली

राजन मंगरूळकर,  परभणीपरभणी शहरातील ७२ वर्षांच्या निर्मलकुमार माणिकलाल कळमकर यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा छंद जोपासला़ आज त्यांच्याकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यासह अटल बिहारी वाजेपयी या राजकीय दिग्गजांबरोबरच थोर साहित्यिक, कलावंतांच्या ३ हजार स्वाक्षरींचा संग्रह झाला आहे़ कळमकर यांनी अशाच कर्तृत्ववान व्यक्तींची दीड हजार नावे नोंद केली असून, त्यांच्या स्वाक्षरी मिळविण्यासाठी ते आजही प्रयत्नरत आहेत़ परभणी शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी निर्मलकुमार कळमकर यांना १९६२मध्ये साहित्यिक पु़ल़ देशपांडे यांना भेटण्याचा योग आला़ यावेळी त्यांनी पु़लं़ची स्वाक्षरी आपल्या डायरीत घेतली आणि तेव्हापासून स्वाक्षरींचा हा प्रवास सुरू झाला़ कोणत्याही ठिकाणी एखादी नामवंत व्यक्ती येणार असेल तर त्या कार्यक्रमास उपस्थित राहून नामवंताला भेटून परिचय देत कळमकर स्वाक्षऱ्या जमा करतात़ या कामी त्यांना त्यांची पत्नी, तिन्ही मुलांचा मोठा हातभार लागला़रोज पाच पत्रे पाठविणे सुरू

ज्यांच्या स्वाक्षऱ्या अद्याप मिळू शकल्या नाहीत, अशा स्वाक्षरींसाठी माझी धडपड सुरू आहे़ संबंधित व्यक्तीच्या घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक शोधून त्यांना पत्र पाठविण्यात येते़ या पत्रात माझ्या छंदाचा उल्लेख करून स्वाक्षरी पाठविण्याविषयी विनंती करण्यात येते़ दररोज चार ते पाच नामवंतांना परभणीतून मी पत्रे पाठवितो़ त्या प्रमाणे अनेकांच्या स्वाक्षऱ्या प्राप्तही होतात़

- निर्मलकुमार कळमकर

अन सावरकरांची  स्वाक्षरी मिळाली गीतकार सुधीर फडके १९६३ साली परभणीत आले असता निर्मलकुमार कळमकर यांनी त्यांची भेट घेतली़. सुधीर फडके यांची स्वाक्षरी घेतल्यावर त्यांना आपल्या छंदाची माहिती देऊन स्वातंत्र्यवीर वि़. दा़. सावरकर यांची भेट घेऊन स्वाक्षरी घेण्याची इच्छा बोलून दाखविली़. त्यावरून सुधीर फडके यांनी मुंबईत सावरकर यांची भेट घालून दिली़.