शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लाल दिवा देणार मतदान झाल्याचा सिग्नल !

By admin | Updated: February 16, 2017 17:12 IST

२४ प्रभागांची अडचण : केंद्रप्रमुखांना राहावे लागणार सतर्क

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी ३१ पैकी २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार प्रवर्गांसाठी दोन ते तीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन राहणार असल्याने मतदारांचा गोंधळ उडण्याची भीती राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु, इव्हीएमवरील प्रत्येक प्रवर्गासाठी बटण दाबल्यानंतर लागणारा लाल दिवा मतदान झाल्याचा सिग्नल देणार असून, चार उमेदवारांना मतदान केल्यानंतर अखेरच्या क्षणी मोठ्या बीप आवाजाने मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे. दरम्यान, यावेळी बीप आवाज आला की नाही, याबाबत मतदान केंद्रप्रमुखांना सतर्क राहून मतदारांकडून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी वाढणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांकरिता ८२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक शाखेने ४५७८ बॅलेट युनिट अर्थात इव्हीएम तयार ठेवले आहेत. प्रत्येक प्रभागातील उमेदवारांच्या संख्येनुसार, इव्हीएमची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानुसार, ३१ पैकी २४ प्रभागांमध्ये मतदान केंद्रावरील बूथवर दोन किंवा तीनच मशीन ठेवण्यात येणार आहेत. मात्र, एकाच मशीनवर दोन गटांच्या मतपत्रिका सेट केल्यास अशिक्षित तसेच ग्रामीण भागातील मतदारांचा गोंधळ उडण्याची भीती राजकीय पक्षांसह उमेदवारांनी व्यक्त केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर यांच्या समवेत झालेल्या राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती, परंतु त्याबाबत कपूर यांनी राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेण्याचे आश्वासन दिले होते. एकाच मशीनवर दोन गट सेट केल्यास मतदारांकडून दोनऐवजी एकच बटण दाबले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण न होता अडचणी उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, निवडणूक शाखेने त्याबाबत म्हटले आहे, उपलब्ध इव्हीएमची संख्या लक्षात घेता प्रशासनामार्फत राबविण्यात येणारे नियोजन बरोबर असून, त्याबाबत मतदारांची जागृतीही केली जात आहे. दोन गटाच्या मतपत्रिका एका मशीनवर असल्यास मतदाराने पसंतीच्या उमेदवाराच्या निशाणीसमोर बटण दाबल्यास लाल दिवा लागणार आहे. सदर लाल दिवा हाच त्या-त्या गटाचा मतदानाचा सिग्नल असणार आहे. चारही उमेदवारांना मतदान करून झाल्यानंतर शेवटी बीप आवाज येईल. त्यावेळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.