शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीनुसार होणार सिग्नलचा वेळ कमी-अधिक

By admin | Updated: April 8, 2017 01:22 IST

गर्दीनुसार सिग्नलचा वेळ कमी-अधिक होण्यासाठी खास संगणकीकृत ‘अ‍ॅडॉपडेट ट्रॅकिंग सिस्टिम’ यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी गर्दीनुसार सिग्नलचा वेळ कमी-अधिक होण्यासाठी खास संगणकीकृत ‘अ‍ॅडॉपडेट ट्रॅकिंग सिस्टिम’ यंत्रणा उभारण्यात येणार आहे. शहरातील तब्बल ३५० प्रमुख चौकांमध्ये सुमारे २५० कोटी रुपये खर्च करून ही सिस्टिम बसविण्यात येणार आहे.शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरामध्ये विविध नव-नवीन योजना राबविण्यात येत आहे. शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने वाहनांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात सकाळ-संध्याकाळ काही चौकांमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होते. सध्या टायमर यंत्रणेद्वारे सिग्नलच्या वेळेचे सेटिंग केली जाते.यामुळे शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठीच्या वेळा सेट करून ठेवल्या जातात. परंतु साचेबद्ध पद्धतीमुळे अनेक वेळा मोठी वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील वाहतूककोंडी नियंत्रित करण्यासाठी ‘अ‍ॅडॉपडेट ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या असून, एका कंपनीची निवड करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. >५० रस्त्यांवर डिजिटल फलक लावणारशहरातील एखाद्या रस्त्यावर अपघात झाला, मिरवणूक, मोर्चा अथवा अन्य कोणत्याही कामानिमित्त रस्ता बंद ठेवण्यात आला असेल तर याची माहिती नागरिकांना देण्यासाठी शहरातील प्रमुख ५० रस्त्यांवर डिजिटल फलकदेखील लावण्यात येणार आहे. संगणक प्रणालीच्या माध्यमातूून अ‍ॅटोमॅटिक रस्ता बंद असल्याची व पर्यायी मार्गाची माहिती डिजिटल फलकाद्वारे मिळणार आहे.तसेच अत्यावश्यक सेवेतील अ‍ॅम्ब्युलन्सला यापुढे जीपीएस सिस्टिम बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ही जीपीएस सिस्टिम संगणक प्रणालीशी जोडण्यात येणार असून, अ‍ॅम्ब्युलन्स विनासिग्नल कमी वेळेत रुग्णालयामध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे.