शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

श्रीपूजक अजित ठाणेकर यांना पालकमंत्र्यांसमोरच मारहाण

By admin | Updated: June 22, 2017 20:03 IST

अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना गुरुवारी पुजारी हटाओ मोहिमेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 20 : अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना गुरुवारी पुजारी हटाओ मोहिमेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोरच मारहाण केली. महिला आंदोलकांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना बाहेर नेण्यात आले. तरीही आंदोलकांचा राग शांत झालेला नव्हता. दरम्यान. पुजारी हटाओ या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली.

अंबाबाई देवीला मागील शुक्रवारी पुजारी बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता भाविकाने दिलेला चोली-घागरा नेसविला. या वादाचे पर्यवसान शनिवारी (दि. १७) जनप्रक्षोभात झाले. गेले आठवडाभर कोल्हापूरात अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’ आंदोलन भाविकांनी सुरु केले आहे. अंबाबाईला घागरा-चोली नेसविल्याच्या प्रकार उघड झाल्यानंतर या आंदोलनाने वेग घेतला. मंदिरातील पुजाऱ्यांनी अनेक भ्रष्ट मार्ग अवंलबल्याचे दाखले देत आंदोलकांनी हे आंदोलन व्यापक केले होते. यासंदर्भात ‘करवीरनिवासिनी अंबाबाईस चोली-घागरा नेसविणाऱ्या व राजर्षी शाहू महाराजांचा अपमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे,’ असे साकडे घालणारे आंदोलन शेकडो सर्वपक्षीय भक्तांनी रविवारी अंबाबाई मंदिरात केले. जिल्हाधिकारी सुभेदार यांनाही आंदोलकांनी निवेदन दिले होते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला आधी केवळ आंदोलकांच्या मोजक्या प्रतिनिधींनाच बोलावण्याचे नियोजन होते. याबाबत बैठकीची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देताच आंदोलकांनी केवळ प्रतिनिधींशी नाही तर सर्व नागरिकांसमवेत समन्वय बैठक लावा, अशी जोरदार मागणी केली जी जिल्हाधिकाऱ्यांना मान्य करावी लागली. त्यामुळे गुरुवारी झालेल्या या बैठकीला भक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.

अंबाबाईला घागरा चोली घातल्याबद्दल श्रीपूजकांनी प्रायश्चित घ्यावे आणि देवीसमोर दोन दिवस उपवास करावा, असा तोडगा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला, मात्र आंदोलकांनी त्यास विरोध दर्शविताच बैठकीला उपस्थित असलेले श्रीपूजक अजित ठाणेकर आंदोलकांसमोर हसत हसत सामोरे आले. त्यामुळे भडकलेल्या आंदोलकांनी ठाणेकर यांनी बाहेर जावे, अशी मागणी केली. परंतु ठाणेकर यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांनी त्यांना मारहाण सुरु केली. पाठोपाठ महिला आंदोलकांनी ठाणेकर यांचा ताबा घेत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन ठाणेकर यांना बाहेर काढले.

दरम्यान. पुजारी हटाओ या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली.