शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या कुशीत श्रीक्षेत्र धारगड यात्रा महोत्सव

By admin | Updated: August 7, 2014 22:50 IST

श्रीक्षेत्र धारगड येथे श्री महादेवाचा यात्रा महोत्सव १0 व ११ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे.

आकोट : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र धारगड येथे श्री महादेवाचा यात्रा महोत्सव १0 व ११ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. या यात्रा महोत्सवामध्ये भाविकभक्तांनी सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्रीक्षेत्र धारगड यात्रा सेवा समिती आकोट व धारगड सदस्यांतर्फे करण्यात आले आहे. निसर्ग सौंदर्य व अध्यात्माचा संगम असलेला श्रीक्षेत्र धारगड यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याचा तिसरा रविवार १0 ऑगस्ट व सोमवार ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात्रा महोत्सवाची तयारी समितीतर्फे सुरू आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यात्रेदरम्यान भक्तांसाठी सेवाभावी संस्था, संघटना व मंडळांतर्फे विविध सेवा-सुविधा करण्यात येणार आहेत. श्रीक्षेत्र धारगड यात्रा सेवा समिती आकोट व धारगडतर्फे भुयारावरील विद्युत रोषणाई करण्यात येईल. डॉ. प्रशांत बिबेकर, डॉ. कपील शेख यांच्यातर्फे शिवभक्तांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. आकोट बजरंग दलातर्फे धारगड भुयार येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जय बाबा बर्फानी अमरनाथ यांच्यातर्फे धारगड भुयारावर मोफत चहा, दि शेगाव श्री अग्रेसन सहकारी पतसंस्थेतर्फे फराळ, रामदेवबाबा समिती सेवा मंडळ खामगाव तर्फे अल्पोहार, अकोला अर्बन बँक कर्मचारीवृंदांतर्फे महाप्रसाद, संत रूपलाल महाराज समितीतर्फे शुद्ध जल वाटप करण्यात येईल. सरस्वती नवदुर्गा उत्सव मंडळ सेवा समिती हिवरखेड यांचेतर्फे शिरा प्रसाद, रामजी ग्रुप अध्यक्ष प्रवीण रामदास बोडखेतर्फे फराळ वाटप, सराफा बाजार नागोबा सेवा समितीतर्फे फराळ वाटप, शिवाजी ग्रुप शेगावतर्फे फराळ वाटप करण्यात येईल. अमरनाथ सेवा मंडळाद्वारे शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र धारगड महादेव यात्रा महोत्सवात मोठय़ा संख्येने भाविक भक्तांनी सहभागी होऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र धारगड सेवा समिती आकोट व धारगडचे पदाधिकार्‍यांनी केले आहे.