शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’वरून श्रेयलढाई

By admin | Updated: May 21, 2016 05:35 IST

यंदाच्या शैक्षणिक वर्षापुरती ‘नीट’ प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापुरती ‘नीट’ प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आणि राज्यात श्रेयाची एकच लढाई सुरू झाली. आम्हीच पुढाकार घेतला होता, असे म्हणत जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी या निर्णयावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी सर्वच नेत्यांनी नीट रद्द झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत श्रेयावर आपली दावेदारी सांगण्याचा प्रयत्न केला. केंद्र शासनाने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वप्रथम विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. न्यायालयातून दिलासा मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची दिल्लीत बैठक झाली आणि अध्यादेशाच्या मुद्द्यावर एकमत झाले. मात्र, त्याची सुरुवात आपणच केली होती असे सांगत मुंडे यांनी कोण, कधी, काय बोलले याची तारीखवार जंत्रीच देऊ केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तर थेट न्यूझीलंडमधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणारी व्हिडीओ क्लिप पाठविली. ‘नीट’मुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण होते. या विषयासाठी मला जेव्हा पालक भेटले तेव्हा मी स्वत: पंतप्रधानांशी संपर्क साधला. राज्यातील ४ लाख विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असल्याचे त्यांना सांगितले. पंतप्रधानांनी माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन नीट परीक्षेचे बंधन रद्द केले. याबद्दल पंतप्रधानांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असे राज यांनी आपल्या संदेशात सांगितले. दरम्यान, महाराष्ट्राने नीटबाबत मांडलेल्या भूमिकेला केंद्र सरकारने पाठिंबा दिला. त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, वेंकय्या नायडू, स्मृती इराणी यांचे आभार मानले. ३० एप्रिलपासून नीटबाबत राज्य सरकारने वेळोवेळी आपली भूमिका मांडून विविध राज्यांच्या मंत्र्यांसोबत, विद्यार्थी व पालकांसोबत बैठका घेऊन याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच हा सकारात्मक निर्णय घेतल्याचे तावडे यांनी सांगितले.>शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख टाळलायुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाचे सारे श्रेय विद्यार्थ्यांना दिले. तणावाच्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी नीटच्या विरोधात आवाज उठविला. त्यामुळे नीट लांबणीवर पडण्याचे सारे श्रेय विद्यार्थ्यांचे असल्याचा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. टिष्ट्वटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख करणे आदित्य ठाकरे यांनी कटाक्षाने टाळले.