शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By admin | Updated: June 12, 2016 02:36 IST

शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.

गजानन कलोरे / शेगाव (जि. बुलडाणा)शेगावीचा राणा माहेरी निघाला।सर्व संतमेळा भजनी रंगला।।लाख लाख कंठामधुनी गजाननाचे भजन।चंद्रभागा हर्षुनी जाई गजानन गजानन।।गण गण गणात बोते.व हरिनामाचा जयघोष करीत शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी श्रींच्या रजत मुखवट्याची संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व विश्‍वस्त नीळकंठ पाटील आदी मान्यवरांनी विधिवत पूजा केली.आषाढी एकादशीसाठी श्रींची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. गत ४९ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ही पालखी निघणार असल्याने मंदिर परिसरातील भाविकांची पहाटेपासूनच गर्दी झाली होती. संस्थाननचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते रजत मुखवट्याची पूजा करण्यात आल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष डॉ.आर.सी. डांगरा, कार्यकारी विश्‍वस्त नीळकंठ पाटील, किशोर टाक, नारायणराव पाटील, त्रिकाळ, अशोक देशमुख, शरद शिंदे, गोविंद कलोरे, राजेंद्र शेगोकार, पंकज शितुत आदी मान्यवर उपस्थित होते. श्रींची पालखी संस्थानच्या प्रांगणातून श्री नागदेवता मंदिर, श्रींचे सेवक वै. बाळाभाऊ महाराज, वै. नारायण महाराज यांच्या मंदिराजवळून निघाली. त्यानंतर महाप्रसाद भवन, तेलीपुरा मार्गे श्रींचे प्रगटस्थळी आल्यानंतर मधुकर घाटोळ, एम.पी. पाटील यांच्यावतीने वारकर्‍यांना फराळ देण्यात आला. नागझरी मार्गावर युवराज देशमुख, अशोक देशमुख यांच्या वतीने चहा देण्यात आला. सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्यावतीने वारकर्‍यांना शरबत देण्यात आले. पालखीसोबत ७00 वारकरी असून, पाण्याचे टँकर, दोन रुग्णवाहिका, पावसाळी साहित्य देण्यात आले आहे. श्रींची पालखीचा दुपारचा मुक्काम श्री क्षेत्र नागझरी व रात्री मुक्काम पारसला आहे. १२ जून गायगाव-भौरद, १३ व १४ ला अकोला श्रींची पालखी जात आहे, असे प्रत्येक गावाला भेटी देऊन श्रींची पालखी १३ जुलैला श्री क्षेत्र पंढरपूरला पोहचत आहे.