शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

४ क्विंटल बटाट्यांपासून श्रींची मूर्ती

By admin | Updated: September 8, 2016 23:30 IST

नवीन संकल्पना पुढे ठेवत तब्बल साडेचार क्विंटल बटाटांच्या साह्याने लाडक्या गणरायाची बनविलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षण बनली आहे.

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 8 - शहरातील मस्तानशहा नगरात बुरुड समाजाच्या वतीने यंदाही एक नवीन संकल्पना पुढे ठेवत तब्बल साडेचार क्विंटल बटाटांच्या साह्याने लाडक्या गणरायाची बनविलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षण बनली आहे. या संकल्पनेने एक तर मोठया खर्चालाही बगल मिळाली असून, आपली कला कायम पुढे ठेवण्यास या समाजातील युवकास संधी मिळाली आहे. बुरुड समाज म्हटले की, नक्षीकाम आलेच. या समाजातील प्रत्येक युवकास नक्षीकाम करण्याची अगदी लहानपणापासूनच सवय जडलेली असते. ती पुढे कायम ठेवण्यासाठी या युवकातर्फे तसे प्रयत्नही केले जातात. या गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन मूर्ती साकारली जाते. तसेच विविध स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबीरही घेतले जातात. मागील १८ वर्षांपासून या मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. १९९९ मध्ये श्रीची मूर्ती बसविण्यास या मंडळाने सुरुवात केली आहे. प्रथम सुप टोपलीची श्रींची मूर्ती, नंतर कवडी-सुपारी, नाराळाच्या जटा, केळीच्या साह्याने मूर्ती बनवून सर्वांचे लक्ष वेधले. यंदा बनविण्यात येणाऱ्या श्रीच्या मूर्तीवर विचार विनिमय झाल्यावरच मंडळाची कार्यकारिणी गठीत केली. जवळपास, चार ते पाच फळांची नावे समोर ठेवली जातात. त्यातून एका फळाचे नाव निवडले जाते. यंदाच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष बाबूराव जोरगेवार, तर उपाध्यक्ष अनील उरेवार, सचिव मनोज देवके हे आहेत. यंदा तब्बल साडे चार क्विंटल बटाटे धाग्याचा आधार घेत मूर्तीकार अब्बय्या प्रभू गुडमलवार, भगवान उरेवार, रमेश उरेवार, राजेश गुडमलवार, पुरुषोत्तम जोरगेवार, संजय उरेवार, ईश्वर उरेवार, गंगाधर जोरेवार, शंकर गुडमलवार आदींनी मूर्ती बनविली आहे. तसेच १२ सप्टेंबर रोजी येथे नेत्र तपासणी शिबिरासह इतरही शिबिरे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. दरवर्षी करण्यात येणाऱ्या श्रींच्या मूर्त्तीची सर्वत्र चर्चा होत असते.