शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीविठ्ठलाचे २५ जूनपासून २४ तास दर्शन मिळणार

By admin | Updated: June 18, 2017 00:27 IST

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात त्यांच्यासाठी २५ जूनपासून २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर (जि. सोलापूर) : सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात त्यांच्यासाठी २५ जूनपासून २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री अशा एकूण चार वाऱ्या भरतात़ सर्वाधिक मोठी आषाढी वारी ४ जुलै रोजी असून यासाठी देहूहून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने तर आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे़ यासह अन्य संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत़ काही वारकरी आषाढी वारी दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेण्यास विलंब होतो म्हणून त्यापूर्वीच पंढरपुरात येऊन दर्शन घेतात व पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होतात़ त्यामुळेच मंदिर समितीने तब्बल ८ दिवस अगोदर म्हणजेच २५ जूनपासून २४ तास दर्शन सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ शिवाय २८ जूनपासून ते ९ जुलैपर्यंत व्हीआयपी तर १ ते १० जुलैपर्यंत आॅनलाइन दर्शनसेवाही बंद ठेवण्यात आली आहे़ त्यामुळे या कालावधीत केवळ रांगेतून येणाऱ्या भाविकांना श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेता येणार असल्याने व्यवस्थापक विलास महाजन यांनी सांगितले़नित्योपचार पूजेत बदलश्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे नित्योपचार - पहाटे ४ वाजता श्रींचा दरवाजा उघडणे, ४ ते ५ काकड आरती व नित्यपूजा, सकाळी ११ ते ११़१५ वा़ महानैवेद्य, दुपारी ४़३० ते ४़५० पोषाख, सायं़ ६़४५ ते ७ धुपारती, रात्री ११ ते १२ पाद्यपूजा, रात्री १२ ते १ शेजारती करून रात्री १ वाजता मंदिर बंद केले जाते़ मात्र आषाढी यात्रा कालावधीत नित्योपचारामध्ये बदल केले असून पहाटे ४ ते ५ या कालावधीत काकड आरती व नित्यपूजा, १०़४५ ते ११ महानैवेद्य आणि रात्री ८़४० ते ९़१०पर्यंत लिंबूपाण्याचा नैवेद्य इतकेच नित्योपचार केले जातील, असे नित्योपचार प्रमुख हणमंत ताटे यांनी सांगितले़