मुंबई/पणजी : केरळ किनारपट्टीला नैऋत्य मॉन्सूनने धडक दिली नसली तरी गुरुवारी महाराष्ट्राच्या काही भागांत आणि गोव्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या़ त्र्यंबकेश्वर व परिसरात गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुमारे तीन तास पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.गुरूवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सकाळी ढगाळ हवामान होते. त्यानंतर मात्र ढग गायब झाल्यानंतर उन्हाचा चांगलाच तडाखा बसत होता. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. धुळे जिल्ह्णातील पिंपळनेर परिसराला गुरुवारी दुपारी १५ मिनीटे वादळी पावसाने तडाखा दिला. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गोव्यातील पणजी, म्हापसा, डिचोली, साखळी, पेडणे, वास्को, मडगाव, सांगे, काणकोण या भागातही पाऊस कोसळला. पावसामुळे मडगाव-पणजी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती़ (प्रतिनिधी)
राज्यात मॉन्सूनपूर्व शिडकावा!
By admin | Updated: June 5, 2015 01:17 IST