शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

श्रावण ते दिवाळी कालावधीत कांदा रडविणार, बाजारभाव दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:00 IST

राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे.

नामदेव मोरे  नवी मुंबई : राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर २० ते ३० रुपये झाले आहेत. दिवाळीपर्यंत आवक कमीच राहण्याची शक्यता असल्याने कांदा सण, उत्सव काळात ग्राहकांना रडविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुंबईमध्ये बहुतांश कांदा हा नाशिक, पुणे परिसरांमधून येतो. राज्यातील इतर शहरांमधूनही कांदा विक्रीसाठी येत असतो. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ९ ते १० रुपये किलो होते. गुरुवारी अचानक हे दर २० ते ३० रुपयांवर गेले. आठ दिवसांपूर्वी १५९६ टन कांदा विक्रीसाठी आला होता. आता आवक १०३६ एवढी कमी झाली आहे. सरासरी ५०० टन आवक घसरली आहे. श्रावण महिना सुरू आहे, गणपती, दसरा व दिवाळीच्या दरम्यानही आवक कमीच राहण्याची शक्यता असून, भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शेतकºयांकडून कमी दराने कांदा खरेदी करून तो साठवून ठेवून कृत्रिम टंचाई केली जात असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.तात्पुरती घसरण : लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद -नाशिक/धुळे - पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गुरूवारी कांद्याला हंगामातील सर्वाधिक २,६९१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. परंतु आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही तासातच भाव पाचशे रुपयांनी घटल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात आला.कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने साठवून ठेवलेला कांदा शेतकºयांनी विक्रीला काढला आहे. त्यामुळे आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ही तात्पुरती घट पहायला मिळाली. लासलगाव बाजार समितीमध्येही असाच प्रकार पहायला मिळाला. कांद्याला २६५० रुपयांचा भाव मिळाला. दुपारपर्यंत ६०३ वाहनातील कांद्याचे लिलाव झाले. त्यानंतर व्यापाºयांनी कमाल भाव १७५० रूपये पुकारण्यास सुरूवात केली. दरात ९५० रूपयांची घट झाल्याचे लक्षात येताच संतप्त शेतकºयांनी लिलाव बंद पाडले.धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत २,६५५ रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. सरासरी भाव २००० ते २५०० रुपये असा राहिला. आवक वाढू लागल्यामुळे उपबाजार समितीने सटाणा रस्त्यालगत ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे यांच्या तीन एकर खुल्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात कांदा मार्केट हलविले आहे. धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातूनही आवक झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली.पुणे जिल्हातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १० किलोस ३०० रुपये भाव मिळाला. मागील वर्षीपेक्षा चौपट भाव मिळाला आहे. १५ हजार पिशवी आवक होऊनही बाजारभाव कडाडले आहेत.गुजरातमधील अतिवृष्टी आणि मध्य प्रदेशातील दीड लाख टन कांदा खराब हवामानामुळे सडल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. महाराष्ट्रातील खरीप कांदा बाजारात येईपर्यंत किमान तीन महिने तरी भावात स्थिरता राहील.किरकोळ बाजारात ३० रुपये किलो-मुंबई बाजार समितीमध्ये २७ जुलैला ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर २० ते ३० रुपये झाले आहेत.