शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हे म्हणे ‘करून दाखवले’

By admin | Updated: January 6, 2017 06:19 IST

अपूर्णावस्थेत असलेल्या अथवा यापूर्वीच सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन अथवा लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी करण्याचा घाट स्थानिक शिवसेना नेत्यांनी घातला आहे

ठाणे : अपूर्णावस्थेत असलेल्या अथवा यापूर्वीच सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन अथवा लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी करण्याचा घाट स्थानिक शिवसेना नेत्यांनी घातला आहे. मागील महापालिका निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीने अपूर्णावस्थेतील कामांच्या उद्घाटनाचा धडाका शिवसेनेने लावला होता.गेल्या निवडणुकीपूर्वी उद्घाटन केलेले ‘वारकरी भवन’ ओसाड अवस्थेत आहे. खेवरा सर्कल येथे उद्घाटन केलेल्या भाजी मंडईचे रूपांतर आता एसआरए योजनेच्या कार्यालयात झाले आहे. यावेळीच्या शिवसेनेच्या उद्घाटन कार्यक्रमावर कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेचे वादळ घोंघावत होते. परंतु, त्याचा अडसर दूर झाल्याचा दावा शिवसेनेने केला. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी उद्घाटने व भूमिपूजन समारंभ उरकण्याची घाई सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना ठाणे शहराचे स्वरूप बदलायचे आहे. विविध विकासकामांचे श्रेय घेणारे प्रशासनाचे आणि सत्ताधारी पक्षाचे वेगवेगळे बॅनर शहरात लागण्याची ठामपाच्या इतिहासामध्ये ही पहिलीच वेळ आहे. मात्र, प्रशासनाच्या माध्यमातून हे श्रेय राज्यातील सत्ताधारी भाजपाने हिरावून घेऊ नये, यासाठी सेनेची धडपड सुरू आहे. ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनामध्ये अर्धवट अवस्थेत असलेल्या मॉडेल रोडचा समावेश आहे. या रस्त्याचा लोकार्पण सोहळा उरकण्यात येणार आहे. ज्युपिटर रुग्णालयासमोरील पादचारी पूल ठाणेकरांसाठी यापूर्वीच खुला झाला असताना त्याचाही लोकार्पण सोहळा होणार आहे. कळवा उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर आता त्याच्या भूमिपूजनाचा घाट घातला आहे. या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा पालिकेचा विचार होता. परंतु, त्यांची वेळ मिळाली नसल्याने या पुलाचे काम अगोदरच सुरू केले आहे. पालिकेने शिवसेनेने आयोजित केलेले हे कार्यक्रम होऊ शकतात, असा दावा केला होता. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याला आक्षेप घेण्यात आला. अखेर, निवडणूक आयोगाकडे याबाबत विचारणा झाली व त्यांच्या मंजुरीनंतर कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली. शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते, खारेगाव येथील हरी पाटील उद्यान, श्रीपत कृष्णा पाटील उद्यान, महिला कर्करोग निदान व उपचार केंद्र, अ‍ॅम्फी थिएटर, एफओबी, मॉडेल रस्ते, नियंत्रण कक्ष वाहन यांचा लोकार्पण सोहळा आणि फायर स्टेशन (आनंदनगर), कळवा ब्रिज, जुने ठाणे नवे ठाणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)