शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपातून अल्पवयीन नवरीची सैराट धूम

By admin | Updated: May 20, 2016 13:16 IST

अल्पवयीन नवरीने लग्नमंडपातून बॉयफ्रेंडसोबत धूम ठोकल्याची घटना संगमनेरात घडली आहे़ विशेष म्हणजे या मुलीने आई- वडिलांविरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

संगमनेर, दि. २० -  अल्पवयीन नवरीने लग्नमंडपातून बॉयफ्रेंडसोबत धूम ठोकल्याची घटना संगमनेरात घडली आहे़ विशेष म्हणजे या मुलीने आई- वडिलांविरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे. 

घुलेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लाऊन दिले जात होते. या मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते. तिच्या इच्छेविरुद्ध लग्न जमवले व विवाह मंडपात अक्षताही पडल्या़. लग्न लागल्यानंतर नवऱ्याला घास भरवित असताना तिच्या जुन्या बॉयफ्रेंडची मंडपात एन्ट्री झाली अन् दोघांनीही सैराट धूम ठोकली़ या मुलीला व तिच्या प्रियकराला मुलीच्या नातेवाईकांनी पकडले.

त्यानंतर मुलीला घरी नेले़ मात्र, शुक्रवारी सकाळीच या मुलीने प्रियकरासोबत संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून आई-वडिलांविरोधात बळजबरीने लग्न लावून दिल्याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूणच हा सर्व प्रकार चित्रपटातील दृश्याला शोभणारा होता.