शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिघी पोर्ट ट्रस्टला कारणे दाखवा

By admin | Updated: April 26, 2017 02:29 IST

दिघी बंदर व्यवस्थापनाने बंदराचे वाढीव बांधकाम करताना आजुबाजूच्या चार गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे उच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही गेली पाच वर्षे काहीच करण्यात आले नाही.

मुंबई : दिघी बंदर व्यवस्थापनाने बंदराचे वाढीव बांधकाम करताना आजुबाजूच्या चार गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे उच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही गेली पाच वर्षे काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने दिघी पोर्ट ट्रस्टसह युडीडी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय,रायगडचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली आहे.२०११ मध्ये दिघी बंदराचे वाढीव बांधकाम करताना व्यवस्थापनाने दिघी, नानवली, सावर्डेकर, मणेरी आदि गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार काही दिवस दिघी बंदर व्यवस्थापनाने गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करूनही दिल्या. मात्र दिघी जवळ असलेल्या कुडकी गावाने पाणी देण्यास नकार दिल्याची सबब पुढे करत व्यवस्थापनाने संबंधित गावांना टँकरने पाणी पुरवण्यास नकार दिला. याविरुद्ध दिघीच्या काही रहिवाशांनी अ‍ॅड. आर. मेंदाडकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.गावकऱ्यांना २०११ मध्ये केवळ १५-२० टँकरने पाणी पुरवण्यात आले. त्यानंतर त्यांना टँकरने पाणी पुरवणे बंद करण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत. दिघी बंदर व्यवस्थापनाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.मंगळवारच्या सुनावणीत दिघी व्यवस्थापनाच्या वकिलांनी एका गावासाठी १०० टँकर पाणी पुरवण्याची आवश्यकता नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. तर राज्य सरकारने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना जून २०१८ पर्यंत संबंधित गावांमध्ये सुरू करू, असे उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. हे चुकीचे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.‘एका गावाला १०० टँकर पाण्याची आवश्यकता नाही, याचा निर्णय व्यवस्थापनाने परस्पर घेतला कसा? कमी टँकर आवश्यक आहेत तर आदेशात सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात यायला हवे होते, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)