शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्ड दाखवा उपचार मिळवा

By admin | Updated: June 12, 2014 01:08 IST

पिवळे आणि केशरी शिधापत्रक (रेशन कार्ड) ३१ नोव्हेंबर २०१३ पूर्वीचे असलेल्यांनाच ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चा लाभ मिळत होता. मात्र शासनाने आज मंगळवारी नोंदणी तारखेचा नियमच

आता जुन्या, नव्या कार्डधारकांना जीवनदायीचा लाभ नाागपूर : पिवळे आणि केशरी शिधापत्रक (रेशन कार्ड) ३१ नोव्हेंबर २०१३ पूर्वीचे असलेल्यांनाच ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चा लाभ मिळत होता. मात्र शासनाने आज मंगळवारी नोंदणी तारखेचा नियमच वगळण्याची सूचना केली. यामुळे ही योजना आणखी व्यापक झाली आहे. रेशन कार्डाचे नुतनीकरण न केलेल्या किंवा नुकतेच रेशन कार्ड काढलेल्यांनाही आता या योजनेचा फायदा मिळणार आहे.‘लोकमत’ने ‘शिधा पत्रिकेच्या दुय्यम प्रतीमुळे लाभार्थी अडचणीत’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. यात शिधा पत्रिकेवरील तारखांमुळे लाभार्थी वंचित राहत असल्याचे उजेडात आणले होते, हे विशेष. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत पूर्वी १ एप्रिल २०१३ च्या पूर्वीचे केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या शिधा पत्रिकाधारकांनाच लाभ देण्याचा नियम होता. नंतर यात नोव्हेंबर २०१३ पर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली. त्यानंतरही अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत होते. विशेषत: २०-२५ वर्षे जुनाट झालेल्या, फाटलेल्या, शिधा पत्रिकेवरील नंबर, वितरीत झालेली तारीख किंवा लाभार्थ्यांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याने लाभार्थ्यांना शिधा पत्रिकेची दुय्यम प्रत सादर करावी लागत होती. अन्नधान्य पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी ही प्रत देताना मात्र नवीन तारीख टाकायचे. यामुळे अनेक लाभार्थी वंचित रहायचे. या शिवाय ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळ्या रंगाचे शिधापत्रक आहे, परंतु वेळेवर या कार्डाचे नुतीनकरण केलेले नव्हते तेही वंचित होते. आता या सर्वांनाच या योजनेत समावून घेण्यात आले आहे. तशा सूचना आज सर्व जीवनदायी आरोग्य योजनेच्या जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आता आरोग्य पत्रकासाठी धावाधावही करावी लागणार नाही. (प्रतिनिधी)