शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा, पाच हजार मिळवा

By admin | Updated: July 28, 2015 02:35 IST

राज्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची आधार कार्ड तयार करून त्यांची ‘सरल’ या संगणकीय कार्यक्रमाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे

- संदीप प्रधान, मुंबईराज्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची आधार कार्ड तयार करून त्यांची ‘सरल’ या संगणकीय कार्यक्रमाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यानंतर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सामाजिक संस्थांकरिता शाळाबाह्य मुलगा दाखवा आणि पाच हजार रुपये मिळवा, अशी योजना सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांनंतर ही योजना लागू केली जाईल, असे शिक्षण विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले.शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि सिस्टीमॅटिक अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अ‍ॅचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट (सरल) संगणकीय प्रणालीबाबतचे आदेश जारी केले. ६ ते १८ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या महिनाभरात ती पूर्ण केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल अचूक माहिती संगणकीकृत करून त्याचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यामुळे बनावट विद्यार्थी नोंदवण्यास व त्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करून त्यांच्या वेतन व पेन्शनचा निधी लाटण्यावर निर्बंध येणार आहेत. परंतु त्याखेरीज विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे गुण नोंदवले जाणार असल्याने कुठला मुलगा-मुलगी शाळेत जातात व त्यांची शैक्षणिक प्रगती काय ते क्षणार्धात समजू शकेल. पुढील तीन महिन्यांत विद्यार्थ्यांच्या संगणकीय नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर शाळाबाह्य मुले दाखवा आणि पाच हजार रुपये मिळवा, ही योजना लागू केली जाणार आहे.त्याचबरोबर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेची अंमलबजावणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषा व गणित विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून घेण्यात येणार आहेत. गेल्या पाच वर्षांत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत ९४ टक्क्यांवरून ७४ टक्के घट झाली आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सर्वेक्षणात भाषा विषयात सरासरी संपादणूक 53%तर गणित विषयात सरासरी संपादणूक ५१ टक्के आहे.भाषा विषयात सर्वोकृष्ट संपादणूक 67%सिंधुदुर्ग जिल्हा, तर सर्वात कमी संपादणूक ३४% सोलापूर जिल्हा गणित विषयात सर्वोकृष्ट संपादणूक 61%भंडारा, तर सर्वात कमी संपादणूक ३४ टक्के औरंगाबाद जिल्हा आहे.