शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

१०० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: February 12, 2016 03:24 IST

यंदापासून सुरू झालेल्या ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल लवकर लागतील अशी अपेक्षा होती.

नागपूर विद्यापीठ : अभियांत्रिकीच्या मूल्यांकनाचा वेग वाढविण्यासाठी परीक्षा नियंत्रकांचे पाऊलनागपूर : यंदापासून सुरू झालेल्या ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल लवकर लागतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत अभियांत्रिकीचा एकही निकाल लागलेला नाही. मूल्यांकनासंदर्भात प्राध्यापकांकडून दाखविण्यात येणारी हलगर्जी हे यासाठी कारण असून परीक्षा विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. सुमारे १०० प्राध्यापकांना परीक्षा नियंत्रकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल , असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु अनेक परीक्षा आटोपून ४५ दिवस उलटून गेले असूनदेखील विद्यार्थ्यांना निकालांची प्रतीक्षाच आहे. अनेक परीक्षांचे निकाल हे ‘डेटा ट्रान्सफर’मध्ये अडथळे आल्यामुळे खोळंबले होते. बहि:शाल विद्यार्थी, तसेच अगोदर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य तऱ्हेने विद्यापीठापर्यंत पोहोचली नाही. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे नामांकन क्रमांक भरले होते. त्यामुळे निकालाशी संबंधित ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक ‘एरर’ दाखविण्यात येत होता.परंतु अभियांत्रिकीच्या निकालांमध्ये सर्वात मोठी अडचण ही प्राध्यापकांकडून मूल्यांकनासाठी न मिळणारा प्रतिसाद ही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांअगोदरच परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेतली होती. प्राचार्यांनीदेखील मूल्यांकनात सर्व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही निकाल जाहीर झालेले नाही. प्राध्यापक मूल्यांकनासाठी गैरहजर राहत असल्यामुळे परीक्षा विभागाचीदेखील अडचण झाली आहे. मूल्यांकनाला गती मिळावी यासाठी परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी १०० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.(प्रतिनिधी)