शिर्डी (जि. अहमदनगर) : अत्यंत संवेदनशील असलेल्या साईमंदिर परिसरात गुरुवारी सायंकाळी दर्शनबारी शेजारी बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून अनावधानाने स्वयंचलित बंदुकीतून गोळी उडाल्याने एकच गोंधळ उडाला़ सुदैवाने गोळी वरच्या बाजूला उडाल्याने यात कुणालाही इजा झाली नाही़ विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची शिर्डीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठक सुरू असतानाच ही घटना घडली़ त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नकुल फलके असे या पोलिसाचे नाव आहे़ सुरक्षेची ड्युटी बदलत असल्याने एसएलआर (सेल्फ लोडिंग रायफल) तपासत असताना ट्रिगर दाबला गेल्याने गोळी उडाली़ उपअधीक्षकांना चौकशी करून याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
साईमंदिराबाहेर पोलिसाच्या बंदुकीतून उडाली गोळी
By admin | Updated: March 5, 2016 04:00 IST