शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

राजपुरीत गाळामुळे होडी व्यावसायिकांना फटका

By admin | Updated: April 30, 2016 02:53 IST

जंजिरा जलदुर्ग तसेच दिघी बंदराला जाण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण अर्थात राजपुरी जंजिरा जलवाहतूक संस्थेतर्फे प्रवाशांची ने - आण केली जाते.

मुरुड : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जंजिरा जलदुर्ग तसेच दिघी बंदराला जाण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण अर्थात राजपुरी जंजिरा जलवाहतूक संस्थेतर्फे प्रवाशांची ने - आण केली जाते. तथापि राजपुरी बंदर गाळाने पूर्ण भरल्यामुळे किनाऱ्यावर होड्या लागू शकत नाहीत. विशेषत: ओहोटीचे वेळी २-३ तास रखडपट्टी होते. राजपुरी बंदरावर प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच बंदरालगत १९ व्यावसायिकांच्या धंद्यावरही फटका बसतो आहे. मेरीटाईम बोर्डाने बंदरातील गाळ उपसून देण्याची मागणी जलवाहतूक संस्थेचे चेअरमन इकबाल शिर्सीकर यांनी केली आहे.बंदरातील गाळ गेल्या १०-११ वर्षांपासून उपसलेला नाही. दिघी पोर्टच्या ड्रेझिंगमुळे राजपुरी पकटीवर मोठ्या प्रमाणावर पुळण आल्याचे बुजुर्ग सांगतात. राजपुरी मुस्लीम समाजातील सुमारे १५० ते २०० कुटुंबे ही जल बोट सेवा तसेच येणाऱ्या पर्यटकांवर मदार ठेवून आहेत. तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग नाही. स्वाभाविक नारळपाणी, फॅन्सी वस्तू, टोपी सेंटर, मिनरल वॉटर, सरबत, कोल्ड्रिंक, पाववडा सेंटर आदी १९ लहान - मोठे धंदेवाईक राजपुरी बंदरात कार्यरत आहेत. अर्थात जंजिरा जल वाहतूक संस्थेने मेरीटाईम बोर्डाकडे बंदरातील गाळ उपसण्यासाठी निवेदनही ३-४ वेळेस दिली आहेत. जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या शिडांच्या होड्यांना पार्र्किंग करताना खूपच कसरत करावी लागते. तरी मेरीटाईम बोर्डाने वरील समस्यांचा गांभीर्याने पाठपुरावा करुन कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. किल्ल्यावर ने-आण करण्यासाठी १३ होड्या असून पर्यटकांना यातून सुरक्षितपणे किल्ल्यावर पोहचवले जाते. प्रत्येक तिकिटामागे एक रुपया लेव्हीकर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिला जातो. या होड्यांवर सुमारे ६० कर्मचारी तैनात असून त्यांना दरमहा ६००० पगार दिला जातो. येथील मुस्लीम तरुण स्वत:च्या अक्कल हुशारीने गाइडचे काम करुन अधिक अर्थार्जन करतात.राजपुरी ते जंजिरा किल्ला हे टेंडर रायगड जिल्हा परिषदेमार्फत काढले जाते व या कामाचा ठेका जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी यांना प्राप्त झाला आहे. सदरच्या रोजच्या जलवाहतुकीमुळे सुमारे ६० मुस्लीम युवकांना रोजगार मिळाल्याने त्यांचा उदरनिर्वाह होण्यास मदत होते. जून ते आॅगस्ट महिन्यापर्यंत येथील वाहतूक बंद असते या तीन महिन्यात येथील तरुणांना घरी बसावे लागते. या संदर्भात जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेचे व्यवस्थापक नाझीम कादरी म्हणाले की, पर्यटकांना आम्ही चांगल्या सुविधा तसेच गाइड पुरवितो. मेरीटाईम बोर्डाने नवीन जेट्टीमुळे पर्यटकांना याचा निश्चित फायदा होणार आहे. परंतु या जेट्टीचे उद्घाटन न झाल्याने ही जेट्टी खुली करण्यात आलेली नाही. महागाईच्या प्रमाणे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने किल्ल्यावर येवून - जावून ५० रुपये तिकीट दराची परवानगी देणे आवश्यक आहे. अल्प अशा २० रुपयांत संस्थेला तोटा सहन करावा लागत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.संस्थेचे चेअरमन इरफान कारभारी म्हणाले की, पर्यटक आम्हाला नेहमी सहकार्य करतात. जास्तीत जास्त लोकांनी किल्ला पहावा अशी इच्छा यावेळी त्यांनी जाहीर केली. राजपुरी ग्रामपंचायत सरपंच हिरकणी गिदी जंजिरा किल्ल्यामुळे आमच्या राजपुरी गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटक उपकरामधून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा फायदा होतो. पर्यटक हे आमचे सर्वस्व असून त्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याकडे कल असतो. त्यामुळे बोर्डाचेही सहकार्य अपेक्षित आहे.