शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’ कायद्याला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: July 3, 2017 04:22 IST

राज्य सरकारने विविध पातळीवर प्रयत्न करूनही रियल इस्टेर रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) कायद्याला बांधकाम व्यावसायिकांचा प्रतिसादच

सुषमा नेहरकर-शिंदे / लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य सरकारने विविध पातळीवर प्रयत्न करूनही रियल इस्टेर रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) कायद्याला बांधकाम व्यावसायिकांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात ३ हजारांपेक्षा अधिक बांधकाम प्रकल्प सुरू असताना दोन महिन्यांत केवळ ७२ बांधकाम व्यावसायिकांनी ‘रेरा’ अतंर्गत नोंदणी केली आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तर अद्याप एकाही बांधकाम व्यावसायिकाने नोंदणी केलेली नाही. बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्याअतंर्गत महाराष्ट्र शासनाने ‘महा रेरा’ हा स्वतंत्र कायदा तयार केला. महाराष्ट्र शासनाने १ मेपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांना किंवा विकासकांना प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. ७२ व्यावसायिकांकडून नोंदणीदोन महिन्यात ७२ बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पांची नोंदणी केली आहे. सर्वांधिक २९ प्रकल्पांची नोंद मुंबई शहर, बृहन्मुंबई येथे झाली. पुणे विभागात २६ प्रकल्पांची नोंदणी झाली. त्यामध्ये पुणे (१८), सातारा व सोलापूर (प्रत्येकी एक), ठाणे (८), रायगड (४), नागपूर, जळगाव (प्रत्येकी एक) येथील प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. नोंदणी न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई होऊ शकते. पंधरा दिवसांत ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणा’ने चार ते पाच प्रकारचे वेगवेगळे अध्यादेश काढले आहेत. चटई क्षेत्र, बँक खाते, मार्केटींग, खरेदी खत, सोसायटी स्थापना आदीबाबत अधिक स्पष्टीकरण देणारे हे अध्यादेश आहेत. पुढील पंधरा दिवसांत जास्तीत जास्त बांधकाम व्यावसायिक नोंदणी करतील,असा विश्वास आहे.- शांतीलाल कटारीया,अध्यक्ष, महाराष्ट्र के्रडाई