शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने राहणार रात्री ११ पर्यंत उघडी

By admin | Updated: January 20, 2016 03:28 IST

दुकाने पहाटे ५पासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची तरतूद असलेल्या किरकोळ आस्थापना धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज तत्त्वत

धोरणास तत्त्वत: मान्यता : शेतमाल थेट विकण्यास मुभामुंबई : दुकाने पहाटे ५पासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची तरतूद असलेल्या किरकोळ आस्थापना धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज तत्त्वत: मान्यता दिली. याशिवाय, साप्ताहिक सुटीविना दुकाने ३६५ दिवस सुरू ठेवता येणार आहेत. या धोरणात आणखी काही सुधारणा करून त्यास मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता दिली जाणार आहे. मात्र नोकरांना नियमित स्वरूपात साप्ताहिक सुटी द्यावी लागेल. या धोरणानुसार किरकोळ दुकानदारांना अत्यावश्यक वस्तू कायद्यातील साठ्याच्या मर्यादेतून वगळण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना माल थेट किरकोळ व्यापाऱ्यांना विकता येऊ शकेल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माध्यम वापरण्याची सक्ती नसेल. किरकोळ व्यापाऱ्यांना त्यामुळे बाजार समितीस सेस द्यावा लागणार नाही. या धोरणामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. किरकोळ दुकानांसाठी एकूण क्षेत्रफळाच्या ७० टक्के जागेवर बांधकाम करता येईल. मात्र, मंजूर एफएसआयचे पालन करणे आणि आग आदी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या लागतील. पार्किंगसाठी अतिरिक्त जागा मिळेल. मजल्यांची उंची ५.५ मीटरपर्यंत वाढविता येईल. मंजूर एफएसआयच्या अतिरिक्त ५० टक्के एफएसआय शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी वापरता येईल; पण त्यासाठी अतिरिक्त प्रीमियम द्यावा लागेल. (विशेष प्रतिनिधी)