शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आता वह्या खरेदी घोटाळा!

By admin | Updated: June 27, 2015 02:43 IST

राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून,

यदु जोशी, मुंबईराज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून, ई-टेंडर पद्धतीने केलेल्या या खरेदीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचे एकाहून एक प्रताप समोर येत असल्याने फडणवीस यांच्यापुढे वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.याबाबत ‘लोकमत’च्या हाती आलेली माहिती अशी - आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीसाठी गेल्या फेब्रुवारीमध्ये ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. १० कंत्राटदारांनी निविदा भरल्या; पण एका विशिष्ट कंत्राटदारालाच कंत्राट मिळावे यासाठी अटी व शर्ती बदलण्यात आल्या. याबाबत काही कंत्राटदारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खरेदी प्रक्रियेबाबत आश्चर्य व्यक्त करीत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशीचे आदेश दिले. गंमत म्हणजे चौकशी अहवालात आक्षेपाच्या १४ मुद्द्यांपैकी केवळ तीनच मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यात आले. तूर्त ही खरेदी थांबवण्यात आली आहे. २०० पेजेसची वही बाजारात जास्तीतजास्त १८ ते २० रुपयांना बाजारात मिळत असताना ३१ रुपये दराने कंत्राट देण्याचे घाटत आहे, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. याच वहीचा पुरवठा २० रुपये दराने करण्याची तयारी अन्य काही कंत्राटदारांनी दाखविली होती....अन् न्यूनतम दराचा आदेश निघालान्यूनतम दर नमूद करणाऱ्या कंत्राटदारालाच कंत्राट देण्याची आजवरची पद्धत बंद करण्यामागे आदिवासी विकास विभागातील हीच खरेदी कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. वस्तूंची अव्वाच्यासव्वा किंमत लावून खरेदी केली जाते. त्याला चाप लावणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल घेतला.