शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांतील खरेदीची चौकशी

By admin | Updated: July 31, 2015 02:57 IST

महिला व बालकल्याण विभागाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या सर्व खरेदीची मुख्य सचिवांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : महिला व बालकल्याण विभागाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या सर्व खरेदीची मुख्य सचिवांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. चिक्की खरेदीतील कथित घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुराव्यांची जंत्री सादर करत जोरदार हल्लाबोल केला. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, असे आव्हान दिल्याने मुंडे विरुद्ध मुंडे असा अभूतपूर्व सामना पाहायला मिळाला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे या मंत्र्यांच्या खात्याकडून झालेल्या खरेदीमधील भ्रष्टाचार व अनियमितता याबाबतची चर्चा विरोधी पक्षाने नियम २६० अन्वये उपस्थित केली होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूत भ्रष्टाचार करणे ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे या प्रकरणाची विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून अशा भ्रष्ट सरकारमध्ये शिवसेनेने क्षणभरही राहू नये, असा सल्ला त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)गरिबाच्या तोंडचा घास खाणार नाहीमाझ्याकडून एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला असेल तर मी स्वत:हून राजकारणातून बाहेर जाईन. पण मी राजकारणातून बाहेर जाण्यासाठी कुणी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असेल तर तो मी यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिआव्हान दिले.मी लहान असल्याने व महिला असल्याने मला लक्ष्य केले जात आहे. परंतु मी सक्षम असून अशा चुका करण्यास इथे आलेली नाही. दलित, गोरगरीब यांच्या तोंडचा घास खाणारी मी नाही. विरोधी पक्षनेत्यांनी संस्कृतीच्या केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून पंकजा म्हणाल्या की, एक महिला सक्षमपणे काम करत असताना तिला घेरणे ही आपली संस्कृती नाही. माझे फोटो लावून प्लॅटफॉर्मवर चिक्की विकणे, अवमानित करणे हे अन्यायकारक आहे. या सर्वोच्च सभागृहात वैयक्तिक द्वेषाचे राजकारण पेरले जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. राणे यांच्यावर आरोपनारायण राणे उद्योगमंत्री असताना चिक्की खरेदी ही सूर्यकांता इंडस्ट्रीजकडूनच करण्याचे आदेश त्यांनी काढले होते. खात्याच्या सचिवांनी त्याला आक्षेप घेतल्यावरही तो दुर्लक्षित करून राणे यांनी आपले आदेश कायम ठेवले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. १८ आॅगस्ट २०१५ पर्यंत सूर्यकांताला मागील सरकारने मुदतवाढ दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.