शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाघाला मारण्यासाठी हैदराबादमधला नेमबाजीतला वाघ दाखल

By admin | Updated: June 28, 2017 18:03 IST

पाच शार्पशूटर्स, ४० वनकर्मचारी व १२० मजुरांना यश न आल्याने अखेर भारतातील नेमबाजीत निष्णात असलेल्या हैदराबाद येथील शूटरला पाचारण करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
ब्रह्मपुरी, दि. 28 - तालुक्यात धूमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात २४ जूनपासून जंगल पिंजून काढणाऱ्या पाच शार्पशूटर्स, ४० वनकर्मचारी व १२० मजुरांना यश न आल्याने अखेर भारतातील नेमबाजीत निष्णात असलेल्या हैदराबाद येथील शूटरला पाचारण करण्यात आले आहे. त्याने तीन दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचा संकल्प सोडला असल्यामुळे वाघ केव्हाही ठार मारला जाण्याची शक्यता बळावली आहे. 
शपथआली नवाब असे या शुटरचे नाव आहे. देशात कुठेही वाघाचा बंदोबस्त करायचा असल्यास त्याला पाचारण करण्यात येत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. शपथआली बुधवारी हळदा परिसरात दाखल झाला. त्याने ‘मिशन टायगर’ सुरू करून जंगल परिसराचे भ्रमण सुरू केल्याची माहिती वनविभागाच्या सूत्राने ‘लोकमत’ला दिली. शपथआली हा नेमबाजीतला ‘वाघ’ असल्यामुळे त्याची आता खऱ्या वाघाशी झुंज होणार असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. 
ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर, भूज, हळदा या परिसरात वाघाने धूमाकूळ घालून आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली. संतप्त गावकऱ्यांनी वाघाच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरून वनविभागाला चांगलेच वेठीस धरले.  यावरून आ. विजय वडेट्टीवार यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालत ठिय्या दिला. आणि वाघाच्या बंदोबस्तासाठीचा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना आदेश हातात घेतल्यानंतरच आंदोलन मागे घेतले. 
दुसऱ्यादिवसापासूनच आदेशानुसार वनविभागाने पोलीस विभागातील पाच शूटर्सना सोबत घेऊन जंगलात ‘मिशन टायगर’ आंरभले. मात्र त्यांना प्रत्येकवेळी वाघाने हुलकावणी दिली. एकदा वाघ विभागाच्या कर्मचा-यांवर वाघ चवताळला, तर एका शूटरवर हल्ला चढविण्याच्या बेतात असताना शूटर बंदूक टाकून पळून गेल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे  वाघाला मारण्यात वनविभागाला रस नाही, असा आरोप गावकऱ्यांकडून पुन्हा सुरू झाला. नेमका वाघ टिपता आला नाही, तर पुन्हा वन्यजीवप्रेमींच्या विरोधाचा सामना करावा लागेल, या भीतीपोटी वनविभागही अतिशय जबाबदारीने वाघाची शहानिशा करायला लागला. मात्र गावकऱ्यांचा रोष कायम असल्यामुळे अखेर वनविभागाने नेमबाजीत तरबेज असलेल्या हैद्राबाद येथील शूटरला  पाचारण केल्याचे सांगण्यात येत आहे.