शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक…म्हणून दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

By admin | Updated: April 25, 2017 16:19 IST

दहा दिवसाच्या चिमुरडीस विष पाजून फरार झालेल्या या नराधम बापाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

ऑनलाइन लोकमतहिंगोली, दि. 25 : मुलगाच हवा होता, पण दैवाने दुसरीही मुलगीच पदरात टाकली. दहा दिवसाच्या या नकोशीला क्रूर बापाने विष पाजले, सध्या ही चिमुरडी मृत्यूशी झुंज देत आहे. चीड आणणारी ही घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. दहा दिवसाच्या चिमुरडीस विष पाजून फरार झालेल्या या नराधम बापाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.  हिंगोलीतील वसमत तालुक्यातील बोराळा येथे पुन्हा मुलगीच झाली म्हणून पित्याने अवघ्या १० दिवसांच्या चिमुरडीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रामकिशन शिवाजी जाधव (२४) याचा विवाह चार वर्षांपूर्वी अंजना (२३) हिच्याशी झाला. त्यांना पहिले अपत्य मुलगी झाली. सध्या ही मुलगी ऋतुजा अडीच वर्षांची असून, दहा दिवसांपूर्वी दुसरी मुलगीच झाली. रामकिशनला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाल्याने चिडलेला रामकिशन पत्नी व १० दिवसांच्या वैष्णवी हिला भेटण्यासाठी रविवारी दुपारी ३.३०च्या सुमारास वाघी येथे सासुरवाडीला आला.तेथे त्याने वैष्णवीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबीयांनी तिला तातडीने विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अंजनाने दिलेल्या फिर्यादीवरून रामकिशनविरूद्ध कलम ३०७ नुसार कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.