शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! सुट्टे पैसे नसल्यामुळे नवजात मुलाचा मृत्यू

By admin | Updated: November 12, 2016 11:28 IST

गोवंडीतील हॉस्पिटलने चलनातून रद्द केलेल्या या नोटा स्वीकारण्यास नकार दिला म्हणून उपचारांअभावी एका नवजात मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12  - केंद्र सरकारने काळा पैसा हद्दपार करण्यासाठी चलनातून 500, 1000  रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जरी हा निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी घेण्यात आला असला तरी यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर तितकेच वाईट परिणाम होत असल्याचे दिसत आहे. 
 
'मुंबई मिरर' वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, हॉस्पिटलने चलनातून रद्द केलेल्या या नोटा स्वीकारण्यास नकार दिला म्हणून उपचारांअभावी एका नवजात मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. गोवंडीमधील ही दुर्दैवी घटना आहे. गोवंडी येथील जीवन ज्योत हॉस्पिटल आणि नर्सिंग होमने या नवजात मुलावर उपचार करण्यास नकार दिला आहे. कारण मुलाच्या पालकांकडे उपचारांसाठीची डिपोझिट करण्याच्या रक्कमेत 500 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. 
 
या मुलावर उपचार होणे फार गरजेचं होते, मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने मुलावर योग्य वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर मुलाचे वडील जगदीश शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांची ही तक्रार पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलकडेदेखील पाठवली आहे. 
 
हॉस्पिटल प्रशासनाने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, असे स्पष्ट आदेश सरकारकडून देण्यात आलेले असतानाही बरेच हॉस्पिटलमध्ये रद्द केलेल्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.