शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ७५ हजार बोगस बालके दाखवून कोट्यवधी लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 02:44 IST

राज्यभरातील बालगृहांमधील प्रकार

मुंबई : राज्य सरकारने अनाथ बालकांच्या संगोपन, शिक्षणासाठी स्थापन केलेल्या बालगृहांसाठी तरतूद केलेल्या कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे. समितीचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी या बाबतचा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर केला.२०१० ते २०१५ या काळात अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे घोटाळे झाले आणि ते करताना तब्बल ७५ हजार बालके ही बोगस होती असा निष्कर्ष काढत लोकलेखा समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची शिफारस केली आहे. २०१०-२०१५ या कालावधीत विभागाने मागितलेल्या निधीपैकी ७६ टक्के म्हणजे ८७१.६ कोटी रुपये मंजूर केले आणि ५९५.६६ कोटी रुपयांची तरतूद केली. या कालावधीत ११५३ बालगृहांमध्ये ९५ हजार बालके सदर योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले. २०१६ मध्ये या प्रकरणाची तपासणी केली असता ज्या बालकांना स्वत:चे घर आहे अशा बालकांनाही प्रवेश देण्यात आला होता. या बालकांना घरी पाठवण्यात आले. तसेच वास्तवात ९५ हजार बालकांपैकी फक्त २१ हजार बालकेच असल्याचे दिसून आले. याचा अर्थ जवळजवळ ७५ हजार पेक्षा जास्त बोगस व अपात्र बालकांची नोंद झाल्याचे आढळून आले. यावरून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अनाठायी खर्च करण्यात आला, असा ठपकाही लोकलेखा समितीने ठेवला आहे.स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी कराहे घोटाळे अजाणतेपणाने निश्चितच झाले नाहीत. त्यात अधिकारी, संस्थाचालकांचे संगनमत होते. या प्रकरणाची तीन महिन्यांत प्राथमिकचौकशी करून अहवाल समितीला द्यावा, तसेच अहवालातील निष्कर्षाच्या आधारे एसआयटीसारख्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, असे समितीने म्हटले आहे.