शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक - पाण्यासाठी मुलाने गमावला जीव

By admin | Updated: May 15, 2016 20:21 IST

नाना-नानी पार्कमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाला घोटभर पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. १५  : नाना-नानी पार्कमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाला घोटभर पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राकेश राजेश चौधरी (वय १५ रा. लोधी गल्ली सोलापूर) असे मृत्‍यू झालेल्‍या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश हा येथील वसंतराव नाईक शाळेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने तो सात रस्ता परिसरात असणार्‍या महापालिकेच्या नाना-नानी पार्कमध्ये गेला होता. पार्कमध्ये सर्व मित्र क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळून तहान लागल्याने राकेश पार्कमध्ये असलेल्या बोअरजवळ पाणी पिण्यासाठी गेला होता. पाणी पिऊन परत जात असताना तेथे असलेल्या विद्युत बोर्डजवळ खुली विद्यूतप्रवाह सुरू असलेल्या वायरला हात लागला. खुल्या वायरमधून हाय होल्टेजचे विद्युत प्रवाह सुरू असल्याने राकेशचा हात लागताच तो वायरला चिटकला. त्यानंतर काही वेळेत तो खाली जमिनीवर पडला. त्याला बेशुध्द अवस्थेत उचलून तत्काळ आई सुशा चौधरी यांनी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. बालाजी गुद्दे यांनी सांगितले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. मृत राकेशचे वडिल बेरोजगार असून आई विडी कारखान्यात विड्या ओळण्याचे काम करून संसाराचा गाडा चालवत होती. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. राकेशच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्‍त होत आहे.