शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जादा वीजबिलामुळे ‘शॉक’

By admin | Updated: August 3, 2016 01:14 IST

इलेक्ट्रिक मीटर फसवे आणि हलक्या दर्जाचे असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त बिले येऊ लागली आहेत.

दौंड : शहरात विद्युत महावितरण कंपनीने बसविलेले इलेक्ट्रिक मीटर फसवे आणि हलक्या दर्जाचे असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त बिले येऊ लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आला आहे. महावितरण कंपनीने फसवे मीटर तातडीने बदलावेत; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष फिरोज खान, माजी अध्यक्ष सुनील शर्मा यांनी विद्युत वितरण कंपनीला दिला आहे. तीन महिन्यांपासून दौंड शहरातील नागरिकांना जास्त प्रमाणात बिले येऊ लागली आहेत. या संदर्भात विद्युत महावितरण कंपनीकडे तक्रार केली असता रीडिंगप्रमाणे बिले घेतली जातात, असे सांगितले जाते. मात्र, शहरात बसविलेल्या मीटरची रीडिंग क्षमता जास्त असल्याने ग्राहकांना बिले जास्त येऊ लागली आहेत. बऱ्याच ग्राहकांना नवीन मीटरदेखील दिले आहेत; मात्र ते बदलून देण्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो, हे धोरण चुकीचे आहे. तसेच, तांत्रिक बिघाड असल्याने मीटरमध्ये ग्राहकांना कधी जास्त, तर प्रमाणापेक्षा जास्त बिल येते. परिणामी विद्युत वितरण कार्यालयाकडे जास्त प्रमाणात तक्रारी येत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. कार्यालयातील काही अधिकारी अरेरावीची भाषा करतात. एकंदरीतच, परिस्थिती पाहता ज्यादा बिल आकारणीमुळे नागरिक हैराण झाला आहे. त्यातच नियम धाब्यावर ठेवून ग्राहकाच्या असहायतेचा फायदा घेऊन विद्युत वितरण कंपनीने वसुली सुरू केली आहे, ती तातडीने थांबवावी. मीटर योग्य असल्याची खात्री करावी, दर्जेदार मीटर बसवावेत जेणेकरून ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त बिल येणार नाही तसेच शहरात ६ कोटी रुपये खर्च करून भूमिगत विद्युत्वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, भूमिगत विद्युत्वाहिनीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. तेव्हा या योजनेची चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. <वारं आलं, तरी बत्ती गुल होतेसध्याच्या परिस्थितीत विजेचा लपंडाव शहरात सुरू आहे. साधी वाऱ्याची झुळूक आली किवा भुर्भुर् पाऊस आला, तरी वीजपुरवठा खंडित केला जातो. याचा उपद्रव नागरिकांना होतो. तरी, शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.