शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शोभा डेंनी खिल्ली उडवलेल्या 'त्या' पोलीस कर्मचा-यावर उपचार सुरु

By admin | Updated: February 28, 2017 13:01 IST

शोभा डे यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवलेल्या मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांच्यावर उपचारास सुरुवात झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवलेल्या मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांच्यावर उपचारास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणूक मतदानावेळी शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो ट्विटरवर शेअर करून ‘मुंबईत हेवी बंदोबस्त’ अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. शोभा डे यांनी उडवलेली खिल्ली मात्र जोगावत यांच्यासाठी फायद्याचं ठरलं असं म्हणावं लागेल.
 
(बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीसाठी ‘तो’ पोलीस मुंबईत)
('त्या' पोलिसाचं शोभा डेंना भन्नाट उत्तर)
(खिल्ली उडवणाऱ्या ‘डें’ची पोलिसांनी काढली शोभा)
 
दौलतराम जोगावत आता वजन घटविणार असून सोमवारी चर्नी रोडवरील सैफी रुग्णालयात ते दाखल झाले. दौलतराम यांचे वजन सध्या १८० किलो इतके आहे. जोगावत यांच्या वैद्यकीय चाचण्यांनंतर प्रसिद्ध बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला सर्जरी करायची की वजन घटवण्यासाठी दुसरा मार्ग निवडायचा यासंबंधी निर्णय घेतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 
 
शोभा डे यांनी ट्विटर करत माझ्या ट्विटमुळे फायदा झाल्याचा आनंद सांगत पोलिसांनी फिटनेस गंभीरपणे घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
 
दरम्यान, शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. १९९३ पर्यंत माझी प्रकृती सर्वसाधारण होती, पण पित्ताशयाचा आजार बळावल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढले आणि वजन वाढत गेले, असे दौलतराम यांनी म्हटले आहे.
 
उपचारांचा खर्च द्या
शोभा डे यांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना जोगावत यांनी, ‘अति खाण्यामुळे माझे वजन वाढलेले नाहीये,’ असे म्हणत, ‘बारीक होणे कुणाला आवडत नाही?’ असेही म्हटले होते. शिवाय, ‘मॅडमने माझ्या उपचारांचा खर्च द्यावा,’ असा टोलाही जोगावत यांनी डे यांना लगाविला होता.