शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

श्लोक प्रदर्शन आजपासून

By admin | Updated: January 11, 2015 00:54 IST

प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘श्लोक’ च्या चित्रप्रदर्शनाला रविवार, दि. ११ जानेवारीपासून नागपुरात प्रारंभ होत आहे.

दर्डा आर्ट गॅलरीत आयोजन : वासुदेव कामत यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर : प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘श्लोक’ च्या चित्रप्रदर्शनाला रविवार, दि. ११ जानेवारीपासून नागपुरात प्रारंभ होत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते रविवारी सकाळी ११ वाजता लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.कलावंतांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘श्लोक’ या कलात्मक चळवळीला अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच श्लोकच्या प्रदर्शनातील कलाकृती पाहण्यासाठी कलारसिकांमध्ये कुतूहल असते. ‘श्लोक’ प्रदर्शनाची संकल्पना शीतल ऋषी दर्डा यांची आहे. कलाकृती रसिकांना भुरळ पाडणारशीतल ऋषी दर्डा यांच्या कल्पनेतूनच या प्रदर्शनाला प्रारंभ झाला आणि अल्पावधीत या प्रदर्शनाने कलारसिकांचे लक्ष वेधले आहे. जागतिक स्तरावरही ‘श्लोक’ चित्र प्रदर्शनाची दखल घेण्यात आली आहे. या प्रदर्शनात वैदर्भीय कलावंतांच्या उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना भुरळ पाडणार आहेत. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा, श्लोकच्या संचालक शीतल ऋषी दर्डा उपस्थित राहतील. याप्रसंगी वासुदेव कामत यांचे कला आणि कलेचा पौराणिक संदर्भ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यानंतर दुपारी १२ वाजता ते ‘पोर्ट्रेट’ चे प्रात्यक्षिकही सादर करणार आहेत. कलारसिकांसाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभविणे ही पर्वणीच असणार आहे. या प्रदर्शनासाठी विदर्भातील चित्रकार आणि शिल्पकार यांच्याकडून त्यांच्या कलाकृती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुंबई येथे एका तज्ज्ञ समितीने कलाकृतींची निवड केली. आलेल्या कलाकृतीतून निवडण्यात आलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. यात वय वर्षे ६ ते वयाची ७१ वर्षे झालेल्या निवृत्त कलाशिक्षकांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)