शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

शिवसेनेचा विरोध ओवेसींच्या पथ्यावर

By admin | Updated: February 5, 2015 00:28 IST

शहरातील पक्षवाढीसाठी सध्या काहीच कार्यक्रम हाती नसल्याने शिवसेनेने ओवेसींच्या सभेला विरोध करत संघर्षात उडी घेतल्याचे बोलले जात आहे.

पुणे : शहरातील पक्षवाढीसाठी सध्या काहीच कार्यक्रम हाती नसल्याने शिवसेनेने ओवेसींच्या सभेला विरोध करत संघर्षात उडी घेतल्याचे बोलले जात आहे. ओवेसींना विरोध केल्याने हिंदुत्वाचा अजेंडा घेवून शिवसेनेने भाजपलाही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आहे. सेनेने केलेल्या विरोध एकप्रकारे ‘एमआयएम’च्या पुण्यातील ‘लाँच’साठी पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. एमआयएमचे राज्यात दोन आमदार निवडून आल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यात आपले संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी ते सभाही घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यात मुस्लिमांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ओवेसी यांची सभा ठरली होती. परंतु, ओवेसीच्या सभेवर नुकतेच शिवसेनत घरवापसी झालेले माजी आमदार विनायक निम्हण यांनी आक्षेप घेतला. ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारायची की नाही, हा पोलिसांच्या अखत्यारितील विषय होता. परंतु ओवेसी हे भावना भडकविणारी भाषणे करतात असा मुद्दा उपस्थित करत सेनेने त्यांच्या सभेला विरोध केला. यातून आपले हिंदुत्ववादी राजकारण सेनेने आपसूक साधले. पुणे शहरातील आठही आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे येथे आपले राजकारण रेटायचे असेल तर हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आक्रमक होण्यासाठी सेनेकडे दुसरा पर्याय नसावा. याच कारणावरुन त्यांनी एमआयएमसोबत संघर्ष केला. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सेनेची बांधणी सुरु झाली असे म्हणता येईल. निम्हण यांनी शहरप्रमुख पद स्वीकारल्यानंतर पहिल्या आठवड्यात ओवेसीच्या सभेला आक्षेप घेत शिवसेना कार्यकर्त्यांमधील आक्रमकपणा जागा करुन नेतृत्वाचेही चुणूक दाखवून वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बुधवारी कोंढव्यात निदर्शने केली. या शिवाय शहरात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याने संपूर्ण शहरात आज शिवसेना आणि ओवेसी यांच्या नावाची चर्चा होती़ शिवसेनेचा पिंडच आंदोलनाचा आणि एखाद्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा आहे़ मुळचे शिवसैनिक असलेल्या निम्हण यांनी कार्यकर्त्यांची ही नस नेमकी ओळखून तिला या निदर्शनाद्वारे मोकळी वाट करुन दिली़ शिवसेनेने आठ वर्षांपूर्वी वीज मंडळाच्या कार्यालयावर केलेल्या आंदोलनानंतर ही मोठी निदर्शने असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने केलेला हा विरोध एमआयएमच्याही पथ्यावरच पडला आहे. या विरोधामुळेच ओवेसीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले़ या विरोधानंतरही ओवेसी यांनी भाषण केलेच. त्यांनाही आपले संघटन वाढविण्यासाठी ही आयतीच संधी मिळाली. एका अर्थाने ओवेसींच्या सभेवरुन या उभय पक्षांकडून झालेले राजकारण या दोघांच्याही हिताचेच ठरले आहे. महापालिका निवडणुकीची नांदी...४शहरातील मुस्लिमबहुल असलेल्या कोंढवा, भवानी पेठ व कॅम्प भागातून तरुण वर्ग सभेकडे आकर्षित झाल्याचे दिसून आले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक शिवसेना व एमआयएम आक्रमक झाल्याने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीची नांदी असल्याचे बोलले जात आहे़ शिवसेनेची कुरघोडी४भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने लावून धरत आला आहे़ या विचाराच्या मतदारांची त्यांची मतपेढी आहे़ मात्र, शिवसेनेच्या आजच्या आक्रमक निदर्शनामुळे या मतपेढीवर कुरघोडी केली असल्याची चर्चा आहे़ पोलिसांचे कौशल्य पणालापुणे : मुस्लिम आरक्षण परिषदेत असदुद्दीन ओवेसी यांची सभा व शिवसेनेचा विरोध याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली़ ओवेसी यांच्या सभेला शेवटच्या क्षणी परवानगी दिली, तर दुसरीकडे सभेदरम्यान गोंधळ होणार नाही, याची खबरदारी घेतली़ गुरुवारी ९०४ शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले. शांतता प्रस्थापित करण्यात मदत केल्याप्रकरणी पुणेकरांचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी आभार मानले.४बुधवारी दुपारी ओवेसी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांना पोलिसांनी कलम १४४ (२) नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. ही नोटीस त्यांनी पत्रकारांसमोरच स्वीकारली. प्रक्षोभक भाषण करण्यास या नोटिसीद्वारे मनाई करण्यात आली होती़ पोलिसांनी परिषदेतील ओवेसींचे भाषण ‘लाईव्ह’ दाखवण्यासही वाहिन्यांना प्रतिबंध केला होता. त्यांचे भाषण संपल्यानंतर काही वेळाने वाहिन्यांनी ओवेसींचे भाषण दाखवले. ४शहरात पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताची आखणी केली होती. दक्षिण व उत्तर विभागाच्या हद्दीमधून तसेच कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकातील निदर्शकांसह ९०४ जणांना ताब्यात घेतल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. ४कोंढव्यामधील ज्योती हॉटेल चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी याठिकाणी त्रिस्तरीय बंदोबस्त लावला होता. मुख्य सभास्थानापासून तीन ठिकाणी वर्तुळाकार बंदोबस्त लावण्यात आलेला होता. याठिकाणी अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर) प्रकाश मुत्याळ, उपायुक्त मनोज पाटील, श्रीकांत पाठक, राजेश बनसोडे, सहायक आयुक्त राजेंद्र भोगले, राजेंद्र भामरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक व गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात होते. ४यासोबत एसआरपीएफ ची एक तुकडी, स्ट्रायकिंग फोर्सही बंदोबस्तासाठी नेमण्यात आल्या होत्या. यासोबतच शहरात फिक्स पॉईंट, वाहन तपासणी, हॉटेल तपासणीवरही भर देण्यात आला होता.पोलिसांवर भिरकावली चप्पलज्योती हॉटेल चौकामध्ये पोलीस शिवसैनिकांना ताब्यात घेत असताना काही महिला कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये बसवत होते. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून पोलिसांवर चप्पल भिरकावण्यात आल्याचा प्रकार घडला. परंतु, त्याला प्रत्युत्तर न देता पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली.